स्थैर्य, पिंपोडे बुद्रुक, दि. २८ : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सध्या वादाचा विषय झालेल्या महाविद्यालयीन परिक्षांबाबत उच्च व तंञशिक्षण विभाग, युजीसी यांनी तत्काळ योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे.
गेल्या काही महिन्यांपासून उध्दभवलेल्या कोरोना विषाणू संसर्गामुळे सर्वञ जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी जारी केलेल्या लॉकडाऊनमध्ये शाळा महाविद्यालये बंद आहेत. त्यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षांचा प्रश्न प्रलंबित आहे. पदवीच्या शेवटच्या वर्षासह प्रथम व्दितीय वर्षाच्या परिक्षा घ्यायच्या कि विद्यार्थ्यांना मागिल गुणांच्या आधारे मार्कस द्यायचे याबाबत उच्च व तंञशिक्षण विभाग व युजीसी यांच्यामध्ये अजूनही एकमत होत नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाची आवास्था निर्माण झाली आहे.
दरम्यान महाविद्यालयीन स्तरावरील व्यवसायिक व अव्यावसायिक अभ्यासक्रमातील परिक्षांबाबत उच्च व तंञशिक्षण विभाग, युजीसी यांच्यावतीने योग्य तो निर्णय घेण्याची मागणी विद्यार्थी वर्गातून होत आहे.
दरम्यान संबंधित विभागांनी योग्य समन्वय साधत विद्यार्थ्यांच्या परिक्षांबाबत तत्काळ निर्णय घेतल्यास नियमित व एटीकेटी असणारे विद्यार्थी यांना निर्णयानुसार अभ्यासाचे नियोजन करता येईल असे पालकांचे म्हणने आहे.