दैनिक स्थैर्य | दि. २८ ऑक्टोबर २०२१ | फलटण | राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी हे सध्या संपावर असून आगामी काळामध्ये आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर तीव्र आंदोलन करू ट, असा इशारा राज्य परिवहन महामंडळाच्या फलटण येथील कर्मचाऱ्यांनी दिला आहे.
आज फलटण येथे राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने संप पुकारण्यात आलेला होता. या संपामुळे फलटण बसस्थानकामधुन एकही बस ही कोणत्याही गावाला गेलेले नाही. त्यामुळे एस.टी. महामंडळाच्या बस मधून जाणाऱ्या चाकरमान्यांच्या मोठी दैना झालेली पाहण्यास मिळाली.
राज्य शासनाने एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्या लवकरात लवकर मान्य करून एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना सुविधा राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता व वाढीव घरभाडे मिळाले पाहिजे, अशा विविध मागण्या एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या आहेत.
कामगार कराराप्रमाणे एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना नियमित वेतन मिळाले पाहिजे. या सोबतच दिवाळी सणानिमित्त एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना बोनसही मिळाला पाहिजे, अश्या विविध मागण्या एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा आहेत.