व्यावसायिकांवर प्रांताधिकाऱ्यांची कडक कारवाई; व्यापाऱ्यांनी सहकार्य करण्याचे प्रांताधिकारी यांचे आवाहन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण, दि. ०७ : कोरोनाच्या वाढत्या प्राश्वभूमीवर फलटण उपविभागीय कार्यालय (महसूल विभाग) व फलटण नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने अनधिकृत पणे सुरू ठेवणाऱ्या दुकानांवर कडक कारवाई करण्यात आलेली आहे. तरी फलटण उपविभागातील सर्व व्यावसायिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन फलटणचे प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप यांनी केलेले आहे.

सातारचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी पारित केलेल्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदारावरती फलटणचे प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप, तहसीलदार समीर यादव, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांच्या संयुक्त पथकाने फलटण शहरातील व्यावसायिकांवरती कारवाई केली.

फलटण शहरासह तालुक्यामध्ये अत्यावश्यक सेवेतील व्यावसायिकांना म्हणजेच हॉस्पिटल, मेडिकल, किराणा दुकानदार, भाजीपाला विक्रते, दूध व बेकरी शॉप्स, मिठाई व खाद्य पदार्थ विक्रते, पेट्रोल पंप, ई-कॉमर्स दुकाने, शेती बाबतीत सर्व सेवा, वृत्तपत्र व सर्व अधिकृत मीडिया यांना सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत आपले व्यवसाय सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. अत्यावश्यक सेवा सोडून इतर सर्व व्यावसायिक यांना आपली अस्थपना सुरू ठेवण्यास परवानगी नाही तरी फलटण तालुक्यातील सर्व व्यावसायिकांनी सहकार्य करावे असे आवाहन फलटणचे प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप यांनी केलेले आहे.

कोरोनाची लाट आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकारने जे कडक निर्बंध लावले आहेत त्यामुळे लहान व्यावसायिक आणि जनसामान्यांमध्ये अस्वस्थता आहे, त्यामुळे फलटण शहरासह तालुक्यातील लहान व्यावसायिकांसह हातगाडी चालकांच्या मध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झालेले आहे.


Back to top button
Don`t copy text!