“पुण्याची ताकद गिरीश बापट”, हजारोंच्या समुदायात गिरीश बापट यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ३० मार्च २०२३ । पुणे । पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे आज पुण्यात दुखःद निधन झाले. ते महाराष्ट्रातील भाजपच्या जेष्ठ नेत्यांपैकी एक होते. चार दशकांच्या राजकीय कारकीर्दीत गिरीश बापट यांनी संघ स्वयंसेवक, कामगार नेता, नगरसेवक, आमदार आणि खासदार, राज्याच्या मंत्रिमंडळात अनेक खात्यांचे मंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अशा विविध पदावर काम केले. पुणे शहरातील राजकारणात बापट यांची चांगली पकड होती.पुण्याची ताकद गिरीश बापट, बापट साहेब अमर रहे च्या घोषात खासदार गिरीश बापट यांच्यावर, बुधवारी सायंकाळी सातच्या सुमारास वैकुंठ स्मशानभूमीत शासकीय इतमामात विद्युत दाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले. ते ७२ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, मुलगा, सून असा परिवार आहे. यावेळी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रासह मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.

खासदार बापट यांच्या निधनानंतर त्यांचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. सायंकाळी साडेपाच वाजता त्यांची अंत्ययात्रा राहत्या घरापासून फुलांनी सजविलेल्या रथातून निघाली. अंत्ययात्रेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह शहर, शहरातील आमदार, माजी नगरसेवक व सर्व पक्षीय कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ओंकारेश्वर मंदिरापासून शगुन चौकातून ही अंत्ययात्रा लक्ष्मी रस्त्याने अलका टॉकिज चौक, शास्त्री रस्त्याने नवी पेठ मार्गे वैकुंठ स्मशानभूमीत आली.

सर्वांचे ‘भाऊ’

पुणे जिल्ह्याच्या राजकारणात ‘भाऊ’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गिरीश बापट यांनी तरुणपणी टेल्को कंपनीत काम केले होते. त्यावेळी त्यांनी कामगारांच्या मागण्यांसाठी अनेकदा लढाही दिला होता. आणीबाणीनंतर गिरीश बापटांच्या राजकीय प्रवासाला सुरूवात झाली. आणीबाणीच्या काळात त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला होता. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनसंघ आणि परिवारातील संस्थांतील विविध पदांची जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पेलली. १९८३ मध्ये पुणे महानगरपालिका निवडणुकीत ते नगरसेवक झाले. सलग तीन वेळा बापट नगरसेवक म्हणून निवडून आले होते. विशेष म्हणजे याच काळात आपल्या सर्वपक्षीय जनसंपर्काच्या जोरावर गिरीश बापट महापालिकेत पक्षाची सत्ता नसतानाही स्थायी समितीचे अध्यक्ष झाले होते.

२०१९ मध्ये पुण्याचे खासदार

गिरीश बापट यांनी १९९५ मध्ये आमदारकीची निवडणूक लढविली होती. पुढे सलग २०१४ पर्यंत ते पाच वेळा निवडून आले. १९९६ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे सुरेश कलमाडी यांनी बापट यांचा पराभव केला होता. २०१४ मध्ये गिरीश बापट यांना लोकसभा निवडणूक लढवायची होती. मात्र, पक्षाने अनिल शिरोळे यांना उमेदवारी दिल्यामुळे त्यांची संधी हुकली. परंतु, २०१९ मध्ये योग्यपणे मोर्चेबांधणी करत त्यांनी खासदारकीचे तिकीट मिळवले. त्यानंतर निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या मोहन जोशी यांचा तब्बल ९६ हजार मतांनी पराभव केला होता.

‘सर्वसमावेशक’ राजकारण

गिरीश बापट हे पुण्याच्या राजकारणात ‘सर्वसमावेशक’ राजकारणासाठी ओळखले जातात. विरोधी पक्षाची सत्ता असली तरी आपले काम साधून घेण्याचे कसब गिरीश बापट यांना उत्तम अवगत आहे. दांडगा लोकसंपर्क हे गिरीश बापट यांची जमेची


Back to top button
Don`t copy text!