बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने प्रियदर्शनी राजा सम्राट अशोक यांचा जयंती महोत्सव उत्साहात संपन्न


दैनिक स्थैर्य । दि. ३० मार्च २०२३ । मुंबई । बौद्धजन पंचायत समितीच्या विद्यमाने प्रियदर्शनी राजा सम्राट अशोक यांचा जयंती महोत्सव कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह, भोईवाडा, परेल, मुंबई – १२ येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक सरचिटणीस राजेश घाडगे यांनी केले, त्यावेळी प्रास्तविक सादर करताना “प्रियदर्शनी सम्राट अशोक यांनी भारत ते अफगाणिस्तान पर्यंत बौद्ध राज्याची पताका फडकवत, बौद्ध धम्म प्रस्थापित केला, धम्माचा प्रचार, प्रसार करण्यासाठी आपल्या मुलांना परदेशी पाठवल, ८४ हजार स्तूपांची निर्मिती करून बौद्ध धम्माच्या गौरवशाली इतिहासाचा पाया मजबूत केला, सम्राट अशोक प्रणित काही वैशिष्ट्ये आपल्या राजघटनेत समाविष्ट करण्यात आली आहेत म्हणून या महान सम्राटाची जयंती देशभरात मोठ्या उत्साहात साजरी केली पाहिजे” असे प्रतिपादन केले, तसेच माजी कार्याध्यक्ष आणि विश्वस्त किशोरजी मोरे, कार्याध्यक्ष लक्ष्मणजी भगत यांनीही आपले विचार व्यक्त करून सम्राट अशोक यांच्या गौरवशाली कारकिर्दीचा, कार्याचा व जीवनाचा आढावा घेतला, सोबतच उपकार्याध्यक्ष मनोहर मोरे, श्रीधर जाधव, राजाभाऊ तथा रामदास गमरे, विलास जाधव, मिलिंद जाधव, भगवान तांबे, संजय मोहिते आदी मान्यवर ही उपस्थित होते.

सदर प्रसंगी सम्राट अशोक जयंती महोत्सवाचे औचित्य साधून समितीच्या सहकार पतपेढीची नवीन कमिटी घोषित करण्यात आली त्यानुसार अध्यक्ष किशोर मोरे, उपाध्यक्ष संजय कापसे, सरचिटणीस सुभाष मर्चंडे, चिटणीस प्रकाश कासे, खजिनदार सुरेश गायकवाड, सदस्य संजय जाधव, तुळशीराम शिर्के, सदस्या स्मिता लोखंडे, कल्पना भगत यांची निवड करण्यात आली या नवनिर्वाचित कमिटीचा जाहीर सत्कार सदर प्रसंगी लक्ष्मण भगत यांच्या शुभहस्ते करण्यात आला.

सरतेशेवटी सरचिटणीस राजेश घाडगे यांनी सर्वांचे आभार मानून जयंती निमित्त मंगल कामना व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता केली.


Back to top button
Don`t copy text!