स्थैर्य, धायरी, पुणे, दि.२५: सातारा पुणे महामार्गावर कात्रज नवीन
बोगद्या जवळ असलेल्या जांभुळवाडी दरी पुला जवळ पहाटे ८ वाहने एकमेकांवर
धडकल्याने भीषण अपघात झाला. त्यात तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत़.
अग्निशामक दलाच्या जवानांनी क्रेनच्या सहाय्याने गाड्या बाजूला करुन आतील
वाहनचालकांची सुटका केली. जखमींना त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात
आले आहे.
याबाबतची प्राथमिक माहिती अशी की, पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास एक
ट्रक दगड घेऊन सातार्याकडून पुण्याकडे येत होता. त्याला मागून आलेल्या
ट्रकने पाठीमागून जोरात धडक दिली. त्यामुळे ही दोन्ही वाहने रस्त्यात अडकून
पडली. त्याच्या मागोमाग आलेल्या वाहनांना ही रस्त्यातील वाहने दिसली नाही.
त्यांनी एका पाठोपाठ पुढच्या वाहनांना धडक दिली. येथे उतार असल्याने अचानक
समोर वाहन दिसल्यावर मालट्रकचा वेग कमी करता येत नाही.परिणामी ते
पाठीमागून पुढच्या वाहनाला जाऊन धडकतात. या दोन ट्रकच्या मागून एक कार येत
होती. तिने पुढच्या ट्रकला जोरात धडक दिली. ही वाहने एकमेकात अडकली.
त्यामुळे कारमधील दोघे आणि ट्रकचालक हे आतमध्ये अडकून पडले होते.
…तर १ जानेवारीपासून लँडलाइनवरून मोबाईलवर होणार नाही कॉल कनेक्ट, काय आहे नवा नियम