राहा निरोगी राहा फिट ! करू नका अट्टाहास नाहीतर व्हाल क्विट !!

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ३१ जानेवारी २०२२ । फलटण । परवाच दोन न्यूज वाचायला मिळाल्या की जिम करताना साधारण ४० वयाचा तरुण अचानक कार्डियाक अरेस्टनी जाग्यावराच गेला. ४५ वयाचा एक बॅडमिंटन पटू फायनल जिंकून हर्ष – उल्हास करताना अचानक जागेवरच कोसळला आणि गेला. हे असं ऐकल्यावर आणि पाहिल्यावर मनात एक प्रश्न नक्कीच फिरायला लागतो की आपण फिटनेस च्या नावा खाली अती तर नाही करत आहोत ना !!

सध्या हेल्थ अवेअरनेस अचानक सगळ्यांमध्ये जागरूक झाला आहे. आणि तो ४० नंतर जास्त दिसतो आहे. पूर्वी फारसा व्यायाम न केलेली मंडळी एकदम फिटनेस फ्रिक झाली आहेत. एका दृष्टीने ते आरोग्यासाठी उत्तमच आहे पण कुठे थांबायचे हे सुद्धा कळले पाहिजे.

४० नंतर जर व्यायाम करायचा असेल आणि फिटनेस वाढवायचा असेल तर खालील गोष्टी नक्की लक्षात ठेवाव्यात.

  1. प्रत्येकाची प्रकृती ही वेगळी आहे. संगळ्यांना एकाच साचात बसवणे नक्कीच घातक आहे.
  2. व्यायाम पूर्वी कधीच केला नसेल तर तो हळू – हळू सुरू करावा, सावकाश वाढवत न्यावा आणि रोज थोडी तरी प्रगती होणे गरजेचे आहे.
  3. पूर्वीचा काही आजार असल्यास त्याचा शरीराला त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. ४० नंतर प्रत्येकानी काही तपासण्या दर वर्षी कराव्या की ज्यामध्ये Haemogram, F/Pp BSL , BUL , S. Creatinine, S. Calcium, S. Vit D, S. Proteins, Lipid Profile Ani Urine R/M, USG Abdomen and Pelvis, ECG, 2D Echo हे सर्व असावे. कुठल्याही आजाराची फॅमिली history असल्यास त्याबद्दल अधिक सतर्क राहावे.
  4. व्यायामाला ट्रेनर असावा आणि त्याला आपली मेडिकल history पूर्णपणे माहिती असणे गरजेचे आहे.
  5. कुठलाही व्यायाम केल्यावर किंवा खेळ खेळल्यावर आनंद मिळाला पाहिजे . त्रास झाला अथवा गळून गेलात तर काही तरी चुकते आहे. आपले शरीर आपल्याला नेहमी संकेत देत असते , ते ओळखायला शिकले पाहिजे.
  6. कोणाशीही स्पर्धा या वयात करायला जाऊ नका. तुम्ही तुमच्याशी स्पर्धा करा आणि कालच्या पेक्षा आज थोडी सुधारणा असणे गरजेचे आहे. Slow and Steady Wins the race. ही म्हण आपल्याला माहीत आहेच.
  7. एवढे करून जर तुम्हाला काही अचानक आजार झाला किंवा काही अघटीत घडले तर ते तुमचे खरंच दुर्दैव!!. शेवटी सर्व विमाने रोज उडतात पण एखादेच कधी तरी पडते त्याला नशिबावर अथवा विधिलिखित म्हणून सोडून द्यावे.
  8. ‘अति तेथे माती ‘. आपल्या शरीराची क्षमता आपल्याला नक्कीच माहिती असते. ती ताणली पण जाऊ शकते . पण ती वाढविण्यासाठी काही कालावधी द्या.

‘Rome was Not Built In A Day’.

प्रत्येकात एक शक्ती आहे ती आधी ओळखायला शिका .
Nothing is Impossible असे आपण नेहमी ऐकत आलो आहोत पण काही possible होण्यासाठी किती अथक परिश्रम घ्यावे लागतात हे जाणून घेणे गरजेचे आहे. त्या मागची साधना समजून घेणं गरजेचं आहे.

तर प्रियजन हो,

  • आरोग्य उत्तम असणे ही सध्या आपली मुलभूत गरज आहे.
  • ते उत्तम ठेवणे आपल्याच हातात आहे.
  • तसे होण्यासाठी नित्यनियम महत्त्वाचा आहे.
  • योग्य व्यायाम , योग्य आहार आणि पुरेशी विश्रांती ही आरोग्याची त्रिसूत्री नेहमी लक्षात ठेवा .
  • कुठल्याही गोष्टीला शॉर्ट-कट मारायला गेलात की कट-कट ही आलीच .कधी कधी मग शॉर्ट सर्किट पण होऊ शकते.

प्रत्येका मध्ये एक परमेश्वरी शक्ती आहे . ती आपल्या मध्ये आहे हेच मुळी पुष्कळ लोकांना माहीत नसते. ती शोधा, ती अनुभवा आणि मग ती वाढवा. त्यासाठी आत्म – परीक्षण करणे फार महत्त्वाचे आहे. ‘सकारात्मकता’ हा तिचा पाया आहे . ‘जिद्द आणि चिकाटी ‘ तिचा सुकाणू आणि ‘जिंकणे आणि मिळविणे’ हा तिचा कळस होय.

जाता जाता एवढेच सांगेन, आनंदी राहा, आनंदाने जगा, आनंद पसरावा, आनंद लुटा. आनंदी आनंद घडे जिकडे तिकडे चोहीकडे.
म्हणणं खूप सोपं आहे , तसं जगणं नक्कीच कठीण. पण तसं जगण्याचा प्रयत्न तर करा , समाधान लाभल्यावाचून राहणार नाही आणि अघटीत काहीच घडणार नाही.

डॉ. प्रसाद जोशी,

अस्थिरोग शल्य – चिकित्सक, जोशी हॉस्पिटल प्रा. ली. फलटण
WhatsApp No.: 7020616909


Back to top button
Don`t copy text!