सत्ताधार्‍यांच्या भूलथापांना बळी न पडता विकासाचा नवा विचार मांडणार्‍या युवा कार्यकर्त्यांच्या पाठीशी रहावे : स्वप्नाली पंडीत

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, कोळकी, दि. ७ : कोळकी गावचा विकास गेली अनेक वर्षे खुंटला आहे. याला कारण केवळ निष्क्रीय सत्ताधारी असून आता सामाजिक बदलाची वेळ आली आहे. कोळकीच्या जनतेने आतापर्यंतच्या अनुभवातून बोध घेत सत्ताधार्‍यांच्या भूलथापांना बळी न पडता विकासाचा नवा विचार मांडणार्‍या युवा कार्यकर्त्यांच्या पाठीशी रहावे, व थापाड्या पुढार्‍यांना आता घरी बसवा, असे आवाहन कोळकीतील प्रभाग क्रमांक 4 च्या भाजपच्या अधिकृत उमेदवार स्वप्नाली पंडीत यांनी केले आहे.

गेली अनेक वर्षे कोळकीची ग्रामपंचायत ताब्यात असूनही सत्ताधार्‍यांनी कोळकीच्या विकासाबाबत उदासिन राहिले आहेत. केवळ निवडणुका आल्या की सत्तेसाठी भूलथापा मारायचा आणि सत्ता मिळाली की दिलेली आश्‍वासने विसरून जायचे, एवढाच अजेंडा सत्तेतील सत्ताधाऱ्यांचा आहे. त्यामुळे विकासाचा नवा विचार मांडणार्‍या आणि जनतेसाठी 24 तास कर्तवदक्षपणे काम करणार्‍या उमेदवारांच्याच पाठीशी रहावे, असे आवाहन स्वप्नाली पंडीत यांनी केलेले आहे.

कोळकीचा मतदारराजा आता भूलथापांना बळी नाही पडणार नाही. मुळात ही लढाई कोणाला पराभूत करण्यासाठी नव्हे तर फक्त गावच्या विकासाची लढाई आहे. उमेदवार किती पैसेवाला आहे हे न पाहता तो गावासाठी काय करू शकतो, हे पाहूनच मतदान करावे, गावासाठी खेळाची मैदाने, अंतर्गत रस्ते, पाणी पुरवठा योजना, भूयारी गटार योजना अशी अनेक विकासकामे होणे गरजेचे आहे. या कामांसाठी मरगळलेले नव्हे तर धडाडीचे तरुण उमेदवारच गरजेचे आहे. त्यामुळे मतांसाठी भूलथापा मारून वेळ मारून नेणार्‍या नेत्यांचे हे काम नव्हे. त्यामुळे कोळकीच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मतदाराराजाने साथ द्यावी, असे आवाहनही स्वप्नाली पंडीत यांनी केलेले आहे.

स्वच्छ चरित्र, विश्‍वासपात्र, कर्तव्यदक्ष अशा धर्मराज देशपांडे यांच्या अर्धांगिनी असलेल्या सौ. स्वप्नाली पंडीत – देशपांडे यांनी पतीच्या कार्यात साथ देत राजकारणात प्रवेश केलेला आहे. पती धर्मराज देशपांडे यांनी मुंबईत व्यवसायात त्यांनी उज्ज्वल यश मिळवले आहे. त्यामुळे कोळकी गावात नवे उद्योग आणून युवा पिढीला कायम स्वरुपी रोजगार पुरवण्याची दृष्टी या दाम्पत्याकडे आहे. राजकारणापेक्षा समाजकार्याची आवड असलेल्या अभ्यासू, नम्र, सामान्यांची जाण, विकासकामांची दूरदृष्टी, वेळ पडल्यास स्वखर्चातून विकासकामे करण्याची तयारी असलेल्या सौ. स्वप्नाली पंडीत – देशपांडे यांच्यामुळे प्रभाग 4 मध्ये विकासाच्या नव्या आशा पल्लवीत झालेल्या आहेत.


Back to top button
Don`t copy text!