Jannah Theme License is not validated, Go to the theme options page to validate the license, You need a single license for each domain name.

महात्मा फुलेंचा पुतळा इंचभरसुद्धा हलवणार नाही – फलटणला फुले जयंती उत्सव समिती आक्रमक

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ७ फेब्रुवारी २०२४ | फलटण |
महात्मा फुले यांचा पुतळा सुशोभीकरण करण्याच्या नावाखाली एक इंचसुद्धा हलू देणार नाही. हा पुतळा तमाम फुलेप्रेमींचे व बहुजन समाजाचे श्रद्धास्थान आहे आणि पुतळा परिसर ही आमच्यासाठी क्रांतिभूमी आहे, असे महात्मा फुले जयंती उत्सव समिती फलटणने म्हटले आहे. फलटण पालिकेने पुतळा मूर्ती जागेवरून हटवणे तसेच मूर्ती बदलणे याबाबत पालिकेत विशेष सभा घेऊन २६ एप्रिल २०२१ रोजी ठराव संमत केला आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

महात्मा फुले जयंती उत्सव समिती व फलटण तालुक्यातील फुले प्रेमी यांनी आज फलटण नगरपरिषद तहसीलदार कार्यालय व फलटण शहर पोलिस स्टेशनमध्ये निवेदन देण्यात आले. यावेळी पालिका अधिकारी तेजस पाटील, फलटणचे तहसिलदार डॉ. अभिजित जाधव व फलटण शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक हेमंतकुमार शहा यांनी निवेदन स्विकारले. यावेळी शेकडो फुलेंप्रेमी उपस्थित होते.

काही राजकीय लोकांकडून समाजातील तीन-चार लोकांना हाताशी धरून फलटण तालुक्यातील हजारो फुलेप्रेमींच्या भावना विचारात न घेता पुतळ्याची जागा व मूर्ती बदलण्याचा घाट घातला आहे. पूर्वीपासून असलेली क्रांतीसूर्य महात्मा फुले यांची मूर्ती ही पूर्णपणे रेखीव व सुस्थितीत असून कारण नसताना मूर्ती व जागा बदलण्याचा घाट घातल्यामुळे फुलेप्रेमींचा उद्रेक होऊ शकतो. याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील, असे जयंती उत्सव समितीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

ठराव रद्द करावा

पुतळा सुशोभीकरण करण्यासाठी व नवीन मूर्ती बसवण्यासाठी पालिकेने एप्रिल २०२१ रोजी केलेला ठराव व त्यास मागितलेली मुदतवाढ, ही त्वरित रद्द करण्यात यावी अन्यथा पालिका प्रशासनाला फुलेप्रेमींच्या उद्रेकास सामोरे जावे लागेल.

– चिपको आंदोलन

फुलेप्रेमींच्या भावना विचारात न घेता पुतळा हलवण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही देखील शांततेच्या मार्गाने आंदोलन करू. आम्ही क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या पुतळ्याला मिठी मारून बसू, आम्ही चिपको आंदोलन करू.

– गोविंद भुजबळ, सदस्य, महात्मा फुले जयंती उत्सव समिती फलटण

फलटण पालिकेला पंधरा दिवसांचा कालावधी देण्यात येत आहे. केलेला ठराव रद्द करावा. यानंतर महात्मा फुले जयंती उत्सव समिती स्वखर्चाने सुशोभीकरण करण्याचे काम हातात घेईल.

– रणजितदादा भुजबळ, समाजिक कार्यकर्ते व फुलेप्रेमी


Back to top button
Don`t copy text!