श्री स्वामी समर्थांबद्दल केलेल्या विधानाचा फलटणमध्ये निषेध


दैनिक स्थैर्य | दि. १२ सप्टेंबर २०२४ | फलटण | काही दिवसांपूर्वी नवी मुंबई येथे जाहीर कार्यक्रमात ज्ञानेश महाराव यांनी अखंड महाराष्ट्राचे दैवत असलेल्या श्री स्वामी समर्थ यांच्या बद्दल अत्यंत खालच्या पातळीचे विधान केल्याने संपूर्ण राज्यातील स्वामी भक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. अश्या इसमांवर शासनाने तातडीने कारवाई करावी; अशी मागणी फलटण येथील श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ यांच्या वतीने करण्यात आली आहे.

फलटण येथील उपविभागीय कार्यालयात फलटण येथील श्री स्वामी समर्थ सेवा मंडळाच्या वतीने प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले. त्यावेळी विविध स्वामी भक्तांनी आपली मनोगत व्यक्त केली.


Back to top button
Don`t copy text!