ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या वतीने विविध मागण्यासाठी प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांना दिले निवेदन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण : धनगर समाजाला एस.टी. आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करावी. त्यानंतर मेगा भरती त्वरित करावी या व इतर मागण्यांसाठी धनगर समाज आणि ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्यावतीने प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांच्या नेतृत्वाखाली ११ ऑगस्टला जिल्ह्यातील विविध तहसील कार्यलयात निवेदन देण्यात आले, असल्याची माहिती महासंघाचे सातारा जिल्हा अध्यक्ष राजू लोखंडे यांनी दिली.

धनगर समाज प्रवर्गातील विद्यार्थीसाठीच्या स्वयंम योजनेबाबत सरकार गप्प का आहे हे समजत नाही. म्हणूनच धनगर समाजातील विद्यार्थ्यांची जातपडताळणी प्रकरणे त्वरीत निकालात काढावी. दुग्धउत्पादनात महत्वाची भूमिका बाजवणाऱ्या मेंढीला राष्ट्रीय पशुचा दर्जा मिळावा. अहिल्यादेवी व यशवंतराव होळकर यांचा इतिहास अभ्यासक्रमात समाविष्ट व्हावा. मेंढपाळ बांधवाना वने आरक्षित करून त्यांना पास उपलब्ध करून दयावे, अश्या आशयाचे निवेदन शासनाला देण्याचा हा आमचा पहिला टप्पा आहे. दरम्यान धनगर समाजाचा घोंगडी बनवणे हा मुख्य व्यवसाय आहे. तो आता अडचणीत आला आहे. त्यामुळे धनगर बांधवसमोर संकट उभे राहिले आहे. 

यावेळी प्रांताधिकारी डॉ.शिवाजी जगताप यांना निवेदन देताना धनगर महासंघाचे सातारा जिल्हा अध्यक्ष राजू लोखंडे, फलटण तालुकाध्यक्ष तानाजी कोलवडकर, फलटण युवक आघाडी अध्यक्ष बापू लोखंडे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. 


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!