विजवितरण कंपनीकडून होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात पुन्हा एकदा अमोल आवळे मैदानात
स्थैर्य, वाठार स्टेशन, दि. २५ (मुकुंदराज काकडे) : वाठार स्टेशन विभागातील नागरिकांना विजवितरण कंपनीकडून देण्यात आलेल्या सरासरी वीज देयकाच्या नावावर अव्वाच्यासव्वा वीज बिले देण्यात आली आहेत याच मुद्यावरून शिवसेना क्षेत्रप्रमुख अमोल आवळे यांनी पुन्हा एकदा वीज वितरण कंपनीच्या विरोधात दंड थोपटले असून पुन्हा एकदा लोकशाही मार्गाने आंदोलनाच्या पवित्र्यात दिसून येत आहेत. बुधवारी त्यांनी महावितरणचे उपअभियंता मंचरे यांना नागरिकांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात निवेदनही सादर केले.
अधिक माहिती अशी की, शिवसेना क्षेत्रप्रमुख अमोल आवळे यांची आंदोलने कष्टकरी, शेतकरी, सामान्य माणसाच्या सदैव हिताच्या बाजूने असतात. अमोल आवळे यांची आंदोलने समाजातील अहिताच्या निर्णय प्रवृत्तीनं विरोधात सतत असतात त्यामुळे असे समाजाच्या अहिताचे निर्णय घेणारांना अमोल आवळे यांच्या आंदोलनाची सतत धडकी भरत असते. बुधवारी शिवसेना क्षेत्रप्रमुख अमोल आवळे यांनी महावितरणचे उपअभियंता मंचरे यांना एक निवेदन दिले यात असे लिहले की, सरकारने दिलेल्या आदेशाचा भंग करून सध्याच्या आप्पतीजनक परीस्थीमध्येही आपल्याकडुन सर्वसामान्य ग्राहकांना सरासरी वीज देयकांच्या नावावर देण्यात आलेली वीज बिले त्वरीत थांबविणेबाबत लेखी निवेदन करण्यात येत आहे मी शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख फलटण-कोरेगांव माध्यमातुन पक्षाचे काम करीत आहे. अशी वस्तुस्थिती असताना सरकारने सध्याच्या आपत्तीजनक परीस्थितीमध्ये लोकांना आर्थिक त्रास होऊ नये म्हणुन चालु परिस्थितीमध्ये वीज मिटरच्या वापराचे रीडींग न करण्याबाबत स्पष्ट आदेश दिलेले असतानाही आपल्याकडुन सदर आदेशाचा भंग करुन सर्वसामान्य ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना सरासरी वीज देयकांच्या नावावर अन्यायकारक रकमा टाकून देण्यात येऊन त्यांना वेठीस धरण्यात आलेले असल्याबाबत अनेक तक्रारी सर्वसामान्य शेतकरी व इतर लोकांकडून पक्षाचा पदाधिकारी म्हणून मला देण्यात आलेल्या आहेत सध्या सुरू असलेल्या आपत्तीजनक परिस्थितीमुळे सर्वसामान्य लोक व शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती अगोदरच खालावलेली आहे अशावेळी आपल्याकडून सरासरी वीज बिलाच्या नावावर अवाजवी बिल देवून त्यांच्यावर अन्याय केलेला आहे तरी आपल्याकडून देण्यात आलेली अशी अवाजवी बिले त्वरित थांबवण्यात यावीत अन्यथा पक्षाच्यावतीने लोकशाही मार्गाने घटनात्मक चौकटीत मोर्चा निदर्शने व आंदोलन करणे भाग पडेल याची नोंद घ्यावी असे अमोल आवळे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. यावेळी रिपाइंचे तालुकाध्यक्ष हेमंत दोरके, काँग्रेसचे जेष्ठ नेते हमीदभाई पठाण, रासपचे भाऊसाहेब वाघ, काँग्रेसचे संजय माने, ग्रा.स सुमित चव्हाण,विशाल जाधव, दत्ता जाधव,उमेश जाधव, गणेश चव्हाण, संतोष मोरे,भगवान चव्हाण, विनोद दोरके आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
लवकरात लवकर महावितरणने समाजहिताचा निर्णय घेवून या आपत्तीजनक काळात गोरगरीब, कष्टकरी, शेतकरी नागरिकांचा अवाजवी बिलाचा प्रश्न तात्काळ सोडवावा अन्यथा शिवसेना स्टाईलने लोकशाही मार्गाने मोर्चा आंदोलन केले जाईल.अमोल आवळे, शिवसेना क्षेत्रप्रमुख फलटण- कोरेगाव विधानसभा मतदारसंघ.
शासनाकडून येणाऱ्या परिपत्रकानुसार यावर आधारित तोडगा काढून सर्वसामान्य जनतेचा विचार करून पुढील निर्णय घेण्यात येईल. उत्तम मंचरे, उपअभियंता वाठार उपविभाग.