दैनिक स्थैर्य | २७ सप्टेंबर २०२२| फलटण | भारत सरकारच्या ग्राहक संरक्षण परिषद समितीच्या महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्षपदी फलटण येथील प्रसिद्ध विधिज्ञ ॲड. जावेद एम. मेटकरी यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे.
ठाणे येथे झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रीय अध्यक्ष शिवशंकर यांच्या आदेशानुसार राष्ट्रीय उपाध्यक्ष पी.वी. वर्गीस यांनी अॅड. जावेद मेटकरी यांना नियुक्ती पत्र दिले.
यापूर्वी त्यांनी सातारा जिल्हाध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले होते.
याबद्दल ॲड. मेटकरी यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहेत.