४५ एकर जमीन त्वरित विकणे आहे
फलटण - सातारा रोडवर मलवडी गावाच्या
रस्त्यालगत, निसर्गरम्य, वीज, पाणी असलेली
प्रदूषणमुक्त ४५ एकर जमीन योग्य किमतींस
त्वरित विकणे आहे.
संपर्क : 8888006611 (WhatsApp)
दैनिक स्थैर्य | दि. ३० जानेवारी २०२४ | फलटण |
मुधोजी महाविद्यालय, फलटण येथे पदवी व पदव्युत्तर विभागामार्फत बुधवार, दि. ३१ जानेवारी रोजी मराठी भाषा संवर्धन सप्ताहानिमित्त राज्यस्तरीय काव्य स्पर्धा व कवी संमेलन आयोजित करण्यात आलेले आहे.
कवी संमेलनाच्या अध्यक्षपदी ‘चांडाळ चौकडी फेम’ गीतकार व ज्येष्ठ कवी मुकूंद मोरे हे आहेत. इच्छुक कवींनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग घ्यावा. काव्य स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय येणार्या स्पर्धकास बक्षीस व सन्मानपत्र देण्यात येईल, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. पंढरीनाथ कदम व पदवी व पदव्युत्तर मराठी विभागप्रमुख प्रो. डॉ. प्रभाकर पवार यांनी केले आहे.