दैनिक स्थैर्य । दि. ११ मार्च २०२२ । सातारा । विधानपरिषदेचे सभापती व सातारा जिल्ह्याचे नेते ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदरील स्पर्धा हि ऑनलाईन स्वरूपात असून जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सातारा जिल्ह्याचे सरचिटणीस राजकुमार पाटील यांनी केलेले आहे.
सदरील स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी विधानपरिषदेचे सभापती व सातारा जिल्ह्याचे नेते ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रतिमेवर चित्र रेखाटायचे आहे. सहभागी होण्यासाठी (प्रदीप लगास – ९९२१५८२४७२) WhatsApp द्वारे नोंदणी करणे आवश्यक आहे.