महाराष्ट्र भूषण नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त फलटणमध्ये रक्तदान शिबिर संपन्न


दैनिक स्थैर्य । दि. ११ मार्च २०२२ । फलटण । रायगड जिल्ह्याच्या अलिबाग तालुक्यातील रेवदंडा येथील महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या सौजन्याने मंगळवारी फरांदवाडी येथे रक्तदान शिबिर संपन्न झाले.

महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त संपूर्ण राज्यभर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. फलटण विभागातून फलटण, कोळकी, साखरवाडी, विडणी, सोमंथळी, वडगाव, लोणंद, निरा, वाठारस्टेशन, होळ, आठ फाटा, नातेपुते, धर्मपुरीसह विविध परिसरातील 139 सदस्यांनी रक्तदान केले.

या शिबिरामध्ये 139 बॅग रक्ताचा साठा उपलब्ध झाला आहे. यावेळी फलटण ब्लड बँकेच्या 12 कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले. या उपक्रमांचे समाजातील सर्व स्तरांमधून कौतूक होत आहे.


Back to top button
Don`t copy text!