दैनिक स्थैर्य | दि. २५ ऑक्टोबर २०२४ | फलटण |
विद्यार्थीप्रिय व तंत्रस्नेही शिक्षक तसेच प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत असणारे व कराड-पाटण शिक्षक सोसायटीचे विद्यमान संचालक प्रवीण भानुदास मोरे यांना अविष्कार जागतिक फौंडेशन, कोल्हापूर यांचेमार्फत दिला जाणारा सन २०२४ चा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार नुकताच कोल्हापूर येथे प्रदान करण्यात आला.
ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत किसनराव कुर्हाडे, ज्येष्ठ पत्रकार ताज मुलाणी तसेच इतर अनेक मान्यवरांच्या हस्ते त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्राथमिक शिक्षक म्हणून सातारा जिल्ह्यातील अतिदुर्गम पाटण तालुक्यात कार्य करीत असताना त्यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बाहे या शाळेला नावलौकिक प्राप्त करून दिला. सध्या त्यांनी फलटण या स्वतालुक्यातील वेळोशी शाळेमध्ये हीच परंपरा कायम ठेवली आहे. शाळेसाठी लोकसहभाग व क्रिडा क्षेत्रात दर्जेदार विद्यार्थी घडविणे यात त्यांचा हातखंडा आहे. सोबतच सहकार क्षेत्रातील अग्रगण्य संस्था असणारी कराड-पाटण शिक्षक सोसायटीचे सर्वात तरुण संचालक होण्याचा बहुमान त्यांना मिळाला आहे..
त्यांच्या या शैक्षणिक, सामाजिक व सहकार क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन अविष्कार फौंडेशन, कोल्हापूर यांनी त्यांना कोल्हापूर येथे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार नुकताच प्रदान केला.
कोल्हापूर येथे पुरस्कार स्वीकारण्यासाठी प्रविण मोरे यांच्यासोबत दत्तात्रय गाढवे, संजयकुमार देशमुख, राजेंद्र जगताप, कराड-पाटण सोसायटीचे माजी संचालक राजेंद्र पवार तसेच कुटुंबीय उपस्थित होते.