अनुबंध कला मंडळातर्फे ३० ऑक्टोबरला ‘सुरमयी दिवाळी’ हिंदी गीतांचा बहारदार कार्यक्रम


दैनिक स्थैर्य | दि. २५ ऑक्टोबर २०२४ | फलटण |
अनुबंध कला मंडळ, फलटणतर्फे ‘सांज दिवाळी’ या सुरमयी दिवाळी कार्यक्रमाचे आयोजन बुधवार, दि. ३० ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी ६.३० वाजता मुधोजी हायस्कूल ग्राऊंड, फलटण येथे करण्यात आले आहे.

हा सौरभ दफ्तरदार प्रस्तुत बहारदार हिंदी गीतांचा कार्यक्रम सौरभ दफ्तरदार, प्रशांत नासेरी, स्वप्नजा लेले व कल्याणी देशपांडे सादर करणार आहेत. त्यांना साथसंगत अमृता ठाकूर-देसाई, मिहीर भडकमकर, अजय अत्रे, अपूर्व द्रविड, विशाल वेलकर हे देणार असून या कार्यक्रमाच्या सोनाली श्रीखंडे या निवेदिका आहेत.

या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन अनुबंध कला मंडळाचे अध्यक्ष अरुण भोईटे, उपाध्यक्ष ब्रह्मानंद (बकुल) पराडकर, सचिव हिरालाल गांधी, खजिनदार रवींद्र येवले व सदस्यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!