दैनिक स्थैर्य | दि. 13 डिसेंबर 2023 | फलटण | कनिष्ठ महाविद्यालयीन अर्थशास्त्र राज्य विचारमंच आणि रयत शिक्षण संस्थेचे छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा यांच्या संयुक्त विद्यमानाने 24 वी राज्यस्तरीय अर्थशास्त्र सहकार परिषद आयोजित केली आहे; अशी माहिती विचार मंचाचे अध्यक्ष प्रा. डॉ. शरद शेटे व छत्रपती शिवाजी कॉलेजचे प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे यांनी दिली.
शनिवार दिनांक 16 व रविवार दिनांक 17 डिसेंबर 2023 रोजी छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा येथे परिषद आयोजित केली असून शनिवार दि. 16 रोजी या परिषदेचे उद्घाटन रयत शिक्षण संस्थेचे सचिव व सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी विकास देशमुख यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी मराठी अर्थशास्त्र परिषदेचे माजी अध्यक्ष प्राचार्य डॉ. जे. एस. पाटील यांचे भारतीय अर्थव्यवस्था या विषयावर यांचे बीज भाषण होणार आहे. बालभारती पुणे चे समन्वयक रविकिरण जाधव, विचार मंचाचे अध्यक्ष प्रा. डॉ. शरद शेटे, प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच संशोधन पद्धती या विषयावर प्रा. डॉ. सारंग भोला यांचे व्याख्यान होणार असून इयत्ता अकरावी बारावी सहकार विषय अभ्यासक्रम व मूल्यमापन यावर चर्चासत्र होणार आहे.
रविवार दि. 17 डिसेंबर रोजी शोधनिबंध सादरीकरण व इयत्ता अकरावी बारावी अर्थशास्त्र विषय अभ्यासक्रम व मूल्यमापन यावर चर्चासत्र होणार असून, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ सातारा प्रभारी कुलसचिव डॉ. विजयकुमार यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. परिषदेच्या अधिक माहितीसाठी प्रा. सतीश जंगम 7588559898 व प्रा. डॉ. अनिलकुमार वावरे 9850117226 यांच्याशी संपर्क साधावा.
तरी या परिषदेस संपूर्ण राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयस्तरावरील अर्थशास्त्र सहकार विषय शिक्षकांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.