पंढरीत ब्ल्यू स्टार सामाजिक व बहुउद्देशिय संस्थेचा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न


दैनिक स्थैर्य । दि. १६ जानेवारी २०२३ । पंढरपूर । ब्ल्यु स्टार सामाजिक व बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने दि. 15 जानेवारी 2023 पंढरीतील विठ्ठल इन येथे राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या सोहळ्यात राज्यातील विविध क्षेत्रातील अनेक गुणवंतांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन पंढरपुर नगरपरिषदेचे नगरसेवक महादेव धोत्रे, नगरसेवक सुधीर धोत्रे, आर.पी.आय. जिल्हा संघटक अमित कसबे, पालघरचे सामाजिक कार्यकर्ते दिनेश भोईर आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन व दीपप्रज्वलन प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. पुरस्कारार्थी सर्व गुणवंतांना मानाचा फेटा बांधुन, शाल सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

हा सर्व कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ब्ल्यु स्टार सामाजिक व बहुउद्देशीय संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा श्रीमती विमल बनसोडे, उपाध्यक्ष अनिकेत जाधव,सचिव चंदन बनसोडे, सहसचिव प्रविण जाधव, सदस्या सौ. सुषमा बनसोडे, सदस्या रिता बनसोडे, सदस्य अजय गायकवाड आदींनी परिश्रम घेतले. यावेळी पुरस्कारप्राप्त गुणवंतांसह पंढरपूर शहर व परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवर मोठया संख्येने उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!