राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा


दैनिक स्थैर्य । दि. ३० ऑगस्ट २०२२ । सातारा । सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत सन 2022-23 मधील मंजूर तरतुदीनुसार दायित्व वजा जाता किती रकमेची कामे घेण्यास वाव आहे याबाबतची माहिती तयार करणे तसेच डोंगरी विभाग विकास कार्यक्रम आणि आमदार स्थानिक विकास कार्यक्रमामधील आमदार महोदय यांनी  सुचवलेल्या कामांना मंजुरी देण्याबाबतची कार्यवाही लवकरात लवकर करण्यात यावी, असे निर्देश राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात जिल्ह्यातील विकास कामांसंदर्भात राज्य उत्पादन शुल्क मंत्री श्री. देसाई यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी निर्देश दिले. या बैठकीला जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, अपर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!