नारी शक्ती पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन


दैनिक स्थैर्य । दि. ३० ऑगस्ट २०२२ । सातारा । जागतिक महिला दिवस हा 8 मार्च रोजी साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून ज्या महिला व संस्थांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी मौलिक कार्य केले आहे अशा महिला व संस्थांना सन्मानार्थ केंद्र शासनाकडून नारी शक्ती पुरस्कार देण्यात येतो. या पुरस्करासाठी अर्ज करावे, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी  व्हि.ए. तावरे यांनी केले आहे.

नारी शक्ती पुरस्कार-2022 साठी पात्र इच्छुक महिला व संस्थांचे विहित नमुन्यातील अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने www.awards.gov.in या संकेस्थळावर करावे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 ऑक्टोंबर 2022 अशी आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, एस.टी. स्टॅन्डजवळ, सातारा येथे संपर्क साधावा.


Back to top button
Don`t copy text!