सदरबझार पोलीस चौकीच्या नुतन इमारतीचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते उद्घाटन


दैनिक स्थैर्य । दि. १५ ऑगस्ट २०२२ । सातारा । सातारा शहर पोलीस स्टेशन अंकित सदर बझार पोलीस स्टेशनच्या नुतन इमारतीचे उद्घाटन राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमास जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अपर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे, यशराज देसाई यांच्यासह पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी श्री. देसाई म्हणाले, पोलीसांना आधुनिक सुविधा देण्यावर शासनाचा भर राहिला आहे. गृह राज्यमंत्री असताना पोलीसांच्या हिताचे अनेक निर्णय घेण्यात आले. त्यामध्ये पोलीस स्टेशनच्या वाहनांचाही समावेश आहे. प्रत्येक पोलीस स्टेशनला वाहने आहेत. पोलीस अधीक्षक श्री. बंसल यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात चांगले काम सुरु आहे. यापुढेही अशा प्रकारे काम करीत रहा, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

पोलीस चौकी उभारण्यासाठी मदत करणाऱ्या व्यक्तींचाही श्री. देसाई यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


Back to top button
Don`t copy text!