
स्थैर्य, फलटण, दि. २२ : सातारचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या आदेशानुसार फलटण उपविभागामधील कंटेंटमेंट झोन सोडून इतरत्र असणार दुकाने व अस्थपना सुरु करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. तरी फलटण उपविभागातील व्यावसायिकांनी आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी ६ फूट सामाजिक अंतर राखणे आवश्यक आहे. तसेच दुकानात एका वेळी ५ पेक्षा अधिक ग्राहक घेण्यास मनाई आहे. उपविभागातील उपरोक्त दुकाने व अस्थापना सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजे पर्यंतच सुरु ठेवण्यात यावेत अशी माहिती फलटण उपविभागाचे उपविभागीय अधिकारी डॉ. शिवाजी जगताप यांनी दिली.
या वेळी अधिक माहिती देताना डॉ. शिवाजी जगताप म्हणाले कि, पुढील आदेश निर्गमित होईपर्यंत हाॅटेल/रेस्टोरंट, जिम, मंगल कार्यालय, शाॅपिंग माॅल, स्वीमिंग पूल, चित्रपट गृहे, काॅलेज/शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था/कोचिंग इंस्टिट्यूट, असेंब्ली हाॅल, क्रिडा / मनोरंजन / धार्मिक लोक एकत्र येण्यावर व सदरील अस्थापने सुरु करण्यास कोणतीही परवानगी देण्यात आलेली नाही, तरी सदरील अस्थापने सुरु करू नयेत.