स्थैर्य, मुंबई, दि. १९ : महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने राज्यांतर्गत प्रवासी वाहतूक सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या प्रवासासाठी ई-पासची आवश्यकता नाही असं राज्य परिवहन मंडळाने म्हटलं आहे.
राज्यात आंतर जिल्हा प्रवासी वाहतूक सुरू करण्यात येणार आहे. यासाठी कोणत्याही पास किंवा परवानगीची गरज नसेल असेल राज्य सरकारने स्पष्ट केले आहे.
एसटीचा प्रवास करताना सोशल डिस्टन्सिंग पाळले जाईल याची खबरदारी घ्यावी असेही या पत्रकात म्हटले आहे. याआधी कोकणात जाणाऱ्या लोकांसाठी एसटी सुरू करण्यात आली होती. आता संपूर्ण राज्यभर एसटी धावणार आहे. प्रवासाआधी आरक्षण काढावे लागणार आहे. त्यामुळे प्रवाशांची नोंद राहील.
एसटी महामंडळातर्फे स्टॅंडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर जाहीर करण्यात येईल. त्यानुसारच पूर्ण प्रवास होणार आहे. हा निर्णय घेण्यापूर्वी राज्य सरकारने तज्ज्ञांशी सल्लामसलत केली.
कंटेनमेंट झोन आणि पायाभूत सुविधांबाबतचा विचार करूनच हा निर्णय घेण्यात आल्याचे राज्य सरकारने सांगितले आहे.
एसटी व्यतिरिक्त जे खासगी वाहनाने प्रवास करतील त्यांना ई-पासची गरज असेल.