उद्या राज्यातील संवेदनशील मार्गावर एसटी सेवा बंद, भारत बंदच्या पार्श्वभूमीवर एसटी प्रशासनाचा निर्णय

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, मुंबई, दि.७: दिल्ली सीमेवर सुरू असलेल्या
शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ उद्या भारत बंद पुकारण्यात आला आहे. या
पार्श्वभूमीवर संवेदनशील मार्गावरील एसटीची वाहतूक बंद राहणार आहे. तसेच या
दरम्यान योग्य खबरदारी घेण्याचे आदेश एसटीच्या सर्व आगारांना प्रशासनाने
दिले आहेत. हे निर्देश एसटीच्या राज्यातील सर्व विभागांना आगारांना देण्यात
आले आहेत.

एसटी प्रशासनाने
दिलेल्या निर्देशांनुसार, एसटीच्या स्थानिक प्रशासनानने माहिती घेऊन
त्या-त्या मार्गावरची वाहतूक सुरू ठेवण्याबाबत निर्णय घ्यायचा आहे. तसेच
ज्या मार्गावर, रस्त्यावर आंदोलन होणार आहे किंवा होत आहे अशा ठिकाणी
वाहतून करू नये असेही या निर्देशात म्हटले आहे.

उद्या सकाळी 11 ते दुपारी 3 वेळेत भारत बंद

शेतकरी
आंदोलनाच्या समर्थनात उद्या सकाळी 11 ते 3 पर्यंत भारत बंद पुकारण्यात
येणार आहे. भारतीय शेतकरी युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत म्हणाले की, आम्ही
शांतीपूर्ण आंदोलन करत आहोत. आम्हाला सामान्य नागरिकांना त्रास द्यायचा
नाही. मंगळवारी भारत बंदची वेळ सकाळी 11 वाजेपासून 3 पर्यंत असेल. याचे
कारण म्हणजे, सकाळी 11 वाजेपर्यंत अनेकजण ऑफिसला जातात आणि दुपारी 3
वाजेपासून सुट्टीची वेळ सुरू होते.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!