एस. टी. चालक प्रशिक्षीत असल्याने त्यांना डिझेल बचतीबाबत अधिक सांगण्याची आवश्यकता नाही : आप्पासाहेब टेंबरे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २१ एप्रिल २०२२ । फलटण ।  महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील (एस. टी.) चालक प्रशिक्षीत असल्याने त्यांना डिझेल बचतीबाबत अधिक काही सांगण्याची आवश्यकता नाही, ते कार्यशाळा कर्मचारी यांचे मदतीने सतत डिझेल बचत करतील अशी अपेक्षा ओंकारा मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे हणमंत बोधलाजी तथा आप्पासाहेब टेंबरे यांनी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एस. टी.) मध्यवर्ती कार्यालयाच्या आवाहना नुसार एस. टी. फलटण आगारात डिझेल बचत मासिक कार्यक्रमाचे उदघाटन ओंकारा ड्रायव्हिग स्कुलचे सर्वेसर्वा हणमंत बोधलाजी तथा आप्पासाहेब टेंबरे यांचे हस्ते दीप्रज्वलन व श्रीफळ वाढवून समारंभपुर्वक करण्यात आले. यावेळी प्रवाशी संघटनेचे अध्यक्ष प्रा. शिवलाल गावडे, आगार व्यवस्थापक रोहित नाईक, प्रभारी सहाय्यक कार्यशाळा अधिक्षक गायकवाड, स्थानक प्रमुख राजेंद्र वाडेकर, वाहतुक निरीक्षक सुहास कोरडे, सहाय्यक वाहतुक निरीक्षक धीरज अहिवळे, पंकज वाघमारे, लहु चोरमले यांच्यासह फलटण आगारातील चालक, वाहक, कर्मचारी, प्रवासी उपस्थित होते.
आगार व्यवस्थापक रोहीत नाईक यांनी प्रारंभी सर्व उपस्थितांचे स्वागत केल्यानंतर प्रास्ताविकात पेट्रोलियम संरक्षण अनुसंधान संघ व मध्यवर्ती कार्यालयाच्या आवाहना नुसार फलटण आगारात डिझेल बचत मासाचे आयोजन केल्याचे निदर्शनास आणून देत सर्व चालकांना जास्तीत जास्त डिझेल बचत करण्याचे आवाहन केले.

प्रा. शिवलाल गावडे यांनी डिझेल बचत कार्यक्रमाची प्रशंसा करुन बचतीमुळे आपले परकीय चलन मोठ्या प्रमाणात वाचते असे सांगितले.
स्थानक प्रमुख राजेंद्र वाडेकर यांनी चालक बंधूनी क्लच – ब्रेकचा योग्य वापर करुन डिझेल बचतीत हातभार लावावा असे आवाहन केले. वाहतुक निरिक्षक सुहास कोरडे यांनी आभार मानले.


Back to top button
Don`t copy text!