दैनिक स्थैर्य | दि. ११ मार्च २०२४ | फलटण |
फलटण येथील श्रीराम बझारचेे विद्यमान चेअरमन श्री. जितेंद्र महादेवराव पवार (दादा), रा. पवारवाडी, ता. फलटण यांची ‘इफको’(इंडियन फार्मर्स फर्टीलायझर को-ऑपरेटिव्ह लि.)च्या १५ व्या जनरल बॉडी प्रतिनिधीपदी सातारा जिल्हा व माळशिरस या Constiuency-24 (iii) Satara विभागातून बिनविरोध निवड झाली आहे.
या निवडीबद्दल जितेंद्र पवार यांचा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला. तसेच फलटण येथील राजे ग्रुपने पवार यांचे अभिनंदन केले आहे.