‘श्रीमंत मालोजीराजे कृषी प्रदर्शन’ शेतकर्‍यांचे ठरले विशेष आकर्षण

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ७ जानेवारी २०२५ | फलटण |
श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषी महाविद्यालय, फलटण आयोजित श्रीमंत मालोजीराजे कृषी प्रदर्शन २०२५ ला अखेरच्या दिवसापर्यंत ८०,००० शेतकर्‍यांची भेट नोंदविण्यात आली.

कृषि प्रदर्शनाच्या उद्घाटनाला महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील व विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर तसेच माजी अध्यक्ष, जिल्हा परिषद अध्यक्ष तथा सेक्रेटरी, फलटण एज्युकेशन सोसायटीचे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर उपस्थित होते.

या कृषी प्रदर्शनामध्ये विविध कृषीसंबंधित कंपन्या, शेती व्यवसायाला लागणार्‍या कृषी निविष्ठा, शेती यांत्रिकीकरण, महिला बचत गट उद्योग, गांडूळखत निर्मिती, हातमाग व घर उद्योग, चर्मकार उद्योग, लोणचे व्यवसाय, विविध कुटिर उद्योग व कृषिविषयक विविध चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले.

४५ एकर जमीन त्वरित विकणे आहे

फलटण - सातारा रोडवर मलवडी गावाच्या
रस्त्यालगत, निसर्गरम्य, वीज, पाणी असलेली
प्रदूषणमुक्त ४५ एकर जमीन योग्य किमतींस
त्वरित विकणे आहे.

संपर्क : 8888006611 (WhatsApp)

या प्रदर्शनात तालुक्यातील शेतकर्‍यांनी आपला शेतमाल विक्रीसाठी आणला व त्याला ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला. यामध्ये प्रामुख्याने ऍपल बोर, ऊस, पपई, संत्रा, भाजीपाला, डाळ, तांदूळ इ. संपूर्ण शेतमाल विकला गेला. तालुक्यातील महिला बचत गटांनी गृहोपयोगी व खाद्यपदार्थ, पापड, लोणचे, मशरूम, गुळपट्टी इ. पदार्थांचे स्टॉल लावून विक्री केली. तालुक्यातील प्रगतिशील शेतकर्‍यांचा सन्मान व सत्कार करण्यात आला. या कृषी प्रदर्शनात विशेष आकर्षण म्हणून श्री. अजिनाथ पवार, वाघोशी यांचा चार पायाचा कोंबडा, श्री. मनोज कदम, गिरवी यांचा खिलार जातीचा काझळ बैलजोडी, श्री. धीरज ढेंबरे, वडजल यांचा खिलार जातीचा चंदर बैल, महाराष्ट्र शासन कृषी विभागाचे फळाचे गाव धुमाळवाडी आकर्षण, के बी कंपनीचे आधुनिक कृषि तंत्रज्ञान, उमेद अभियानाचे विविध स्टॉल, पशुसंवर्धन विभाग आणि पाणी फौंडेशनचे प्रात्यक्षिक हे विशेष आकर्षण ठरले. तसेच विविध कंपन्यांचे ट्रॅक्टर, शेतीयंत्र व अवजारे, मोटार गाड्या, शेतीतंत्र यांची बहुसंख्य प्रमाणात शेतकर्‍यांना अधिकृत विक्रेत्यांकडून विक्री करण्यात आली.

प्रदर्शनाच्या अखेरच्या दिवसापर्यंत फलटण तालुक्यातील व पंचक्रोशीतील बहुसंख्य ७०,००० ते ८०,००० पेक्षा अधिक शेतकर्‍यांनी कृषी प्रदर्शनाला भेट दिली व श्रीमंत मालोजीराजे कृषी प्रदर्शन २०२५ हे फलटण तालुक्यातील शेतकर्‍यांचे विशेष आकर्षण ठरले.


Back to top button
Don`t copy text!