क्रीडामंत्री सुनिल केदार यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय धावपटू कु.ज्योती चव्हाण हिला आर्थिक सहाय्य


स्थैर्य, नागपूर, दि. 18 : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव रोखण्याकरिता सर्वत्र लॉकडाऊन लागू करण्यात आला. या लॉकडाऊनमुळे नागपूर जिल्ह्यातील हिंगणा येथील आंतरराष्ट्रीय धावपटू कु.ज्योती चव्हाण या खेळाडू समोर उदरनिर्वाहचा प्रश्न उपस्थित झाला. तिला कुटुंबाचा निर्वाह करणे कठीण झाले. या परिस्थितीत तिला क्रीडा कौशल्य टिकवून ठेवण्यासाठी पोषक आहाराकरिता तातडीची मदत म्हणून नागपूर जिल्हा क्रीडा परिषद खात्यातून 25 हजार रुपयाचा धनादेश क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनिल केदार यांच्या हस्ते देण्यात आला.

यावेळी ना. केदार यांनी जिल्ह्यातील मान्यताप्राप्त आंतरराष्ट्रीय स्पर्धेमधून सहभागी झालेल्या ज्या खेळांडूची आर्थिक स्थिती हलाखीची आहे आणि कोविड-19 मुळे उदरनिर्वाह करण्यास आर्थिक अडचण भासत आहे अशा खेळाडूंची माहिती संकलित करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. यावेळी क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे सहसंचालक डॉ. जयप्रकाश दुबळे, उपसंचालक डॉ. सुभाष रेवतकर, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, तालुका क्रीडा अधिकारी श्रीमती आशा मेश्राम आदी उपस्थित होते.

धावपटू कु. ज्योती चव्हाण हीने वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्स इटली-2019 मध्ये भारताकडून द्वितीय स्थान प्राप्त केले असून या स्पर्धेत ती 11 व्या स्थानी राहिलेली आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!