
दैनिक स्थैर्य | दि. १६ सप्टेंबर २०२३ | फलटण |
श्री सद्गुरू हरिबुवा महाराज नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन तेजसिंह भोसले (दादा) यांच्या वाढदिवसानिमित्त महाराजा मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी शिबिरास फलटणकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
महाराजा मंगल कार्यालय येथे संपन्न झालेल्या शिबिराप्रसंगी श्री सद्गुरू व महाराजा उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष दिलीपसिंह भोसले, श्री सद्गुरू हरिबुवा महाराज शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तुषार गांधी, सद्गुरू पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन राजाराम फणसे, संचालक प्रभाकर फणसे, विक्रांत कदम, महाराजा टुरिझमचे अमोल सस्ते आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी संस्थेच्या संचालिका मृणालिनी भोसले (दीदी) यांना वाढदिवसानिमित्त उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक श्री सद्गुरू व महाराजा उद्योग समूहाचे सीईओ संदीप जगताप यांनी केले. महाराजा मल्टीस्टेटचे व्हाईस चेअरमन रणजितसिंह भोसले यांनी उपस्थितांचे आभार मानले.

