दैनिक स्थैर्य | दि. १४ नोव्हेंबर २०२४ | फलटण | फलटण पंचायत समितीेच माजी सभापती तथा युवा नेते श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांनी आमदार दीपक चव्हाण यांना निवडून आणण्यासाठी जोरदारपणे कंबर कसली असल्याचे चित्र दिसून येत असून त्यांनी सुरु केलेल्या गावभेट दौर्याला ग्रामस्थांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे पहायला मिळत आहे. विशेषम्हणजे निवडणूक प्रचार सुरु झाल्यापासून तब्बल 70 हून अधिक गावांमध्ये जावून मतदारांशी संवाद साधण्यात ते यशस्वी झाले आहेत.
फलटण – कोरेगांव विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून आमदार दीपक चव्हाण सलग चौथ्यांदा निवडणूक लढवत असून त्यांच्या प्रचारार्थ श्रीमंत विश्वजीतराजे हे संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढत आहेत. वाघाची वाडी, राजेकुरण बंगला, शिंगाडे वस्ती, मोहिते वस्ती, भीमनगर, नांदल, धुळदेव, पिंप्रद, टाकळवाडे, विठ्ठलवाडी, शिंदेमाळ, माळवाडी, चव्हाणवाडी, आरडगाव, सोमंथळी, सोनगाव, सरडे, राजाळे, अलगुडेवाडी, साठे, मठाचीवाडी, वाजेगाव, निंबळक, गुणवरे, मुंजवडी, गोखळी, पवारवाडी, ढवळेवाडी, आसु, हणमंतवाडी, शिंदेनगर, उपळवे, दर्याचीवाडी, जाधवनगर, सावंतवाडा, वेळोशी, तरडफ, मानेवाडी , ताथवडा, कांबळेश्वर, खुंटे , शिंदेवाडी, चौधरवाडी, भिलकटी , जिंती, निंभोरे, आसु, खराडेवाडी, खामगाव, तडवळे, रावडी खु, कुसूर, मिरेवाडी, परहर खु, कोरेगाव, पाडेगाव, सुरवडी,घाडगेमळा, कापशी, आळजापूर, बिबी, टाकुबाईचीवाडी, सासवड, आंदरुड, जावली, मिरढे, शेरेशिंदेवाडी, नाईकबोमवाडी, वडले, सोनवडी खुर्द, सोनवडी बु. तिरकवाडी, दुधेबावी, भाडळी खुर्द, सांगवी, आदर्की खु., सोनवडी बु., सोनवडी खु., शेरेचीवाडी, परहर बु., हिंगणगाव, जिंती आदी गावांमध्ये श्रीमंत विश्वजीतराजे यांचा गाव भेट दौरा पार पडला आहे.
या गाव भेट दौर्यावेळी श्रीमंत विश्वजीतराजे गावातील युवा, महिला, ज्येष्ठ नागरिक अशा सर्वांशीच संवाद साधत असून सदर संवादादरम्यान, ‘‘आपल्या सगळ्यांचे नेते श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी फलटण तालुक्यासाठी दिलेले योगदान सर्वांना माहित आहे. फलटण तालुक्यात पाणी आणून आपली दुष्काळी तालुका ही ओळख त्यांनी पुसून टाकली आहे. विरोधकांनी कितीही खोटा प्रचार केला तर मतदार सूज्ञ आहेत. आपले आमदार दीपक चव्हाण यांनी गेली 15 वर्षे आपल्या भागाचे चांगल्या प्रकारे प्रतिनिधीत्व केलेले आहे. आता त्यांना सलग चौथ्यांदा आपल्या विधानसभेत पाठवायचे आहे. राज्यातली राजकीय परिस्थिती दूषित झालेली आहे. ही परिस्थिती सुधारण्यासाठी शरद पवार लढा देत आहेत. त्यामुळे त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय आम्ही सर्वांनी घेतला आहे. या निर्णयाच्या पाठीशी तुम्हीही ठामपणे उभे राहून आमदार दीपक चव्हाण यांना विजयी करावे’’, असे आवाहन ते मतदारांना करीत आहेत.