
दैनिक स्थैर्य । 23 जुलै 2025 । फलटण । राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत सातारा व मेढा येथे भव्य महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात सातारा- जावली मतदारसंघातील हजारो रक्तदात्यांनी रक्तदान करून रुग्णसेवा वृद्धिंगत करत शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
रक्तदान म्हणजेच जीवनदान..! महाराष्ट्र राज्याचे लाडके आणि लोकप्रिय मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ’महारक्तदान संकल्प’ हा अनोखा उपक्रम राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा- जावली भारतीय जनता पार्टीच्या वतीने राबवण्यात आला.
सातारा येथील कला व वाणिज्य कॉलेज (कोटेश्वर मैदानाशेजारी) आणि मेढा येथील जावली पंचायत समिती येथे महा रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. सातारा येथील शिबिराचे उदघाटन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या हस्ते आणि ना. शिवेंद्रसिंहराजे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी माजी उपनगराध्यक्ष अविनाश कदम, अमोल मोहिते, जयेंद्र चव्हाण, प्रकाश बडेकर, भालचंद्र निकम, फिरोज पठाण, रवी ढोणे, महेश गाडे, संभाजी इंदलकर, अविनाश खर्शीकर, रवी पवार, हर्षल चिकणे, विमलाकर कारंडे, श्रीमंत तरडे, कर्तव्य सोशल ग्रुपचे सर्व सदस्य, भाजपचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. सायंकाळी उशिरापर्यंत रक्तदात्यांचे रक्तदान सुरु होते.
मेढा ता. जावली येथे पंचायत समितीच्या आवारात या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उदघाटन ना. शिवेंद्रसिंहराजे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे, प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे, भाजप तालुकाध्यक्ष सबंदीप परामने, मारुती चिकणे, बाजार समितीचे सभापती जयदीप शिंदे, सागर धनावडे, रामभाऊ शेलार, मोहन कासुर्डे, हणमंत पार्टे, पांडुरंग जवळ, विकास देशपांडे, शिवाजी गोरे, संतोष वारागडे, यशवंत आगुंडे, निलेश शिंदे, आर. डी. भोसले, हणमंत शिंगटे, सुरेश पार्टे, श्रीहरी गोळे आदी मान्यवरांसह भाजपचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. सातारा व मेढा येथे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक यांच्यासह हजारो रक्तदात्यांनी रक्तदान करून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.