दैनिक स्थैर्य | दि. ३० जानेवारी २०२४ | फलटण |
फलटण येथील श्रीराम बझार या संस्थेच्या मुख्य कार्यालयाच्या प्रशस्त जागेत रविवार, दि. २८ जानेवारी २०२४ रोजी महिला हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या हळदी-कुंकू समारंभास फलटण शहर व परिसरातील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
याप्रसंगी श्रीराम बझारच्या वतीने महिला सेविकांनी कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या महिलांना हळद-कुंकू लावून पंढरपुरी चहा, संतूर साबन, जी. एस. चहा, सुहाना पावभाजी मसाला, सुहाना पनीर मसाला, स्टील बाऊल अशा प्रकारचे वाणवसा साहित्य भेट देवून उपस्थित महिलांना शुभेच्छा दिल्या.
सायंकाळी ४.०० वाजता श्रीराम बझार व स्वयंसिद्धा उद्योग समूह यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी ‘पैठणी होममिनीस्टर – कोण जिंकणार पैठणी कार्यक्रम’ आयोजित करणेत आला.कार्यक्रमाचे सादरकर्ते झी टी. व्ही. हास्यसम्राट फेम राहुल भालेराव यांनी कार्यक्रमाचे अतिशय चांगल्या प्रकारे सादरीकरण केले.
याप्रसंगी स्वयंसिद्धा उद्योग समूहाच्या संस्थापिका अॅड. सौ. मधुबाला भोसले, माजी नगरसेविका श्रीमंत सुभद्राराजे ना. निंबाळकर (आक्कासाहेब), सौ. लक्ष्मीबाई पवार, सौ. अर्चना पवार, सौ. मृणालिनी भोसले, सौ. प्रियदर्शनी भोसले, सौ. सविता कर्ण, सौ. विद्या रणवरे, सौ. वनिता शिंदे, सौ. भाग्यश्री बेलदार, सौ. नलिनी तावरे, सौ. जयश्री फणसे, सौ. मयुरा गांधी, सौ. अपर्णा सस्ते यांच्यासह फलटण शहर व परिसरातील महिला उपस्थित होत्या.
कार्यक्रमामध्ये फलटण शहर व परिसरातील २००० हून अधिक महिलांनी हळदी-कुंकू समारंभामध्ये सहभाग घेवून हळदी-कुंकू समारंभाचा तसेच पैठणी होममिनीस्टर कार्यक्रमाचा आनंद लुटला. पैठणी होममिनीस्टर कार्यक्रमातील बक्षीस विजेत्या महिलांना मान्यवरांचे हस्ते पैठणी साडी वितरण करणेत आली.
हा कार्यक्रम पार पाडणेसाठी श्रीराम बझारचे अधिकारी, सेवक वर्ग व स्वयंसिद्धा महिला संस्थेचे कर्मचारी यांचे उत्कृष्ट सहकार्य लाभले.