दैनिक स्थैर्य । दि. १५ सप्टेंबर २०२२ । सातारा । औद्योगिक न्यायालय आणि जिल्हा विधी सेवा समिती, जिल्हा व सत्र न्यायालय, सातारा आयोजित ‘मेडिएशन अवेरनेस’ कार्यक्रम दि. 13 सप्टेंबर 2022 रोजी औद्योगिक आणि कामगार न्यायालयाच्या सभागृहात संपन्न झाला.
औद्योगिक न्यायालयाचे न्यायाधीश प्रविण चतुर, कामगार न्यायालयाचे न्यायाधीश श्रीमती रहाणे, मध्यस्थीतज्ञ ॲड. राजश्री सावंत, आणि ॲड. एस.बी. शिंदे, अध्यक्ष,लेबर लॉ प्रॅक्टिशनर्स असोसिएशन, सातारा यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमाला वकील, पक्षकार, इस्माईलसाहेब मुल्ला लॉ कॉलेजचे विद्यार्थी-शिक्षक, विमा कंपनीचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि मान्यवरांचे स्वागत ॲड. शिंदे यांनी केले तर सूत्रसंचालन ॲड. योगेश करपे यांनी केले. मध्यस्थीतज्ञ ॲड. राजश्री सावंत यांनी उपस्थितांना मध्यस्थी या मार्गाने समुपदेशन करून विवादाचे निवारण कसे करता येते, याबाबत मार्गदर्शन केले.
न्यायाधीश श्री. चतुर यांनी दैनंदिन जीवनातील उदाहरणे सांगून मध्यस्थीद्वारा समुपदेशनाचे महत्त्व पटवून दिले.
ॲड. विजय चव्हाण यांनी सर्वांचे आभार मानले.