दैनिक स्थैर्य । दि. १५ सप्टेंबर २०२२ । सातारा । राजघराण्याचे बारावे वंशज व शाहूनगरीचे माजी नगराध्यक्ष व राजघराण्याचा भक्कम आधारवड , कुशल मार्गदर्शक व मनोमिलनाचे शिल्पकार श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले (वय ७५) यांच्या निधनाने अवघा सातारा सुन्न झाला आहे. शोकाकुल वातावरणामध्ये संगम माहुली येथील राजघाटावर शिवाजीराजे भोसले यांच्यावर बुधवारी दुपारी पावणेचार वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले तमाम सातारकरांनी बुधवारी सर्व व्यवहार बंद ठेवत त्यांना श्रद्धांजली वाहिली.
अदालतवाडा या निवासस्थानी शिवाजीराजे भोसले यांचे पार्थिव दुपारी एक वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. दर्शनासाठी आलेल्या अनेकांच्या अश्रूंचा बांध फुटल्याने अदालतवाडाही निःशब्द झाला होता .साताऱ्याचे माजी नगराध्यक्ष आणि राजघराण्यातील बाराव्या पिढीचे सदस्य थोर समाजकारणी श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे वृद्धापकाळाने मंगळवारी पुणे येथे निधन झाले. मंगळवारी रात्री उशिरा त्यांचे पार्थिव अदालतवाडा येथे आणण्यात आले. रात्री अकरापासूनच त्यांच्या अंत्यदर्शानाला सातारकरांनी अदालतवाडा येथे गर्दी केली. बुधवरी सकाळी वृषाली राजे भोसले शिवाजीराजे भोसले यांचे नातू कौस्तुभादित्य पवार राजमाता कल्पनाराजे भोसले, खासदार उदयनराजे भोसले, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, सत्यजितसिंह गायकवाड वेदांतीकाराजे भोसले, विक्रमसिंहराजे भोसले, माजी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, कोल्हापूरचे शाहू महाराज, संभाजीराजे छत्रपती, जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बंसल आमदार शशिकांत शिंदे, माजी आमदार आनंदराव पाटील, सत्यजीत पाटणकर, माजी उपनगराध्यक्ष किशोर शिंदे, उद्योजक फरोख कूपर, यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शिवाजीराजे भोसले यांच्या पार्थिवाचे दर्शन घेऊन त्यांना आदरांजली वाहिले.
दुपारी दीड वाजता फुलांनी सजविलेल्या रथातून शिवाजीराजे भोसले यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. आदालत वाडा येथून अंत्ययात्रेला शोकाकुल वातावरणात सुरुवात झाली अंतयात्रा अदालत वाडा समर्थ मंदिर चौक येथून राजवाडा राजपथावरून पोवई नाका बॉम्बे रेस्टॉरंट चौक ते राजघाटावर संगम माहुली येथे नेण्यात आली सातारा शहरात ठीक ठिकाणी सातारकरांनी शिवाजीराजे भोसले यांचे अंत्यदर्शन घेत त्यांना श्रद्धांजली वाहिली व पुष्पहार अर्पण करून अखेरचे दर्शन घेतले संगम माऊली येथे राजघाटावर अंत्यसंस्काराची तयारी करण्यात आली होती राजघराण्यातील प्रथेप्रमाणे राजकारणातील सर्व सदस्यांनी अंत्यदर्शन घेऊन दोन मिनिटे मौन ठेवून श्रद्धांजली वाहिली वृषाली राजे भोसले यांचे चिरंजीव कौस्तुभ आदित्य यांनी आपल्या लाडक्या आजोबांना मुखाग्नी दिला राजघराण्याशी संबधित असणाऱ्या पंचकुळी सदस्यांच्या उपस्थितीत हा अंत्यविधी पार पाडण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते आमदार शशिकांत शिंदे उद्योजक फरक कूपर माजी उपनगराध्यक्ष शंकर माळवदे कराडचे माजी आमदार आनंदराव पाटील ज्येष्ठ क्रीडा समीक्षक सुरेश साधले कॉम्रेड किरण माने बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र चोरगे माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब बाबर शिवपुरी अक्कलकोटचे विश्वस्त आनंद ब्रम्हे इत्यादी सदस्यांनी शिवाजीराजे भोसले यांना शोक संदेशाद्वारे श्रद्धांजली वाहिली शिवाजीराजे भोसले यांच्या निधनामुळे सर्वसाधारकरांनी आपले व्यवहार उत्स्फूर्तपणे बंद ठेवल्याने सातारा शहरांमध्ये दिवसभर संपूर्णपणे शुकशुकाट जाणवत होता. नेहमी राजपथावर जाणवणारी वरदळ आज शांत होती शिवाजीराजे भोसले यांची अंत्ययात्रा साताऱ्यातून काढण्यात आली त्यावेळी हजारो सातारकरांनी आपल्या लाडक्या राजाचे अखेरची दर्शन घेतले हे दर्शन घेताना बरेच जणांना आपले अश्रू आवरले नाहीत श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करून शोक व्यक्त केला आहे पंतप्रधान मोदी यांनी एक अलौकिक व्यक्तिमत्व हरपल्याने समाजाचे मोठे नुकसान झाल्याचे प्रतिक्रिया नोंदवली आहे.