खंडाळा येथे महाविकासआघाडीचे कार्यकर्त्यांनी बैलगाडीतून मिरवणूक काढत केंद्
स्थैर्य, खंडाळा, दि.९: केंद्र शासनाने मनमानीपणे संमत केलेल्या कृषी कायदयाच्या विरोधात शेतक-यांनी पुकारलेल्या भारत बंदला खंडाळा तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी खंडाळा ,शिरवळ येथील व्यापा-यांनी दुकाने अत्यावश्यक सेवा वगळता 100 टक्के बंद ठेवल्याने गावागावांमध्ये शुकशुकाट दिसून आला.
यावेळी खंडाळा पोलीस ठाणे व शिरवळ पोलीस ठाणे हद्दीत भारत बंदचे अनुषंगाने मेडिकल ,दवाखाने, दूध संकलन, एस टी बस सेवा सुरू असून इतर प्रकारची दुकाने बंद ठेवत भारत बंदला कडकडीत पाठिंबा दिला.
तसेच महाविकास आघाडीचे स्थानिक कार्यकर्ते चंद्रकांत ढमाळ, अशोक गाढवे, दयानंद खंडागळे, प्रकाश गाढवे, संपत खंडागळे व त्यांचे सोबत १५ ते २० कार्यकर्ते यांनी खंडाळा शहरात बैलगाडी मधून केंद्र सरकार विरोधात घोषणा देत मिरवणूक काढली.
त्याचप्रमाणे शिरवळ येथील ग्रामस्थांच्या आवाहनानुसार व्यापा-यांनी अत्यावश्यक सेवा वगळता दुकाने बंद ठेवल्याने भाजी मंडईसह शिरवळ व परिसरात 100 टक्के बंद पाळण्यात आला.
यावेळी शिरवळ व खंडाळा पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.