
दैनिक स्थैर्य | दि. ४ सप्टेंबर २०२४ | फलटण |
‘हॅप्पी थॉटस्’ या संस्थेच्या आध्यात्मिक पुस्तकांची गाडी फलटण येथे दि. ३ व ४ सप्टेंबर रोजी दिवसभर विक्रीसाठी उपलब्ध राहणार आहे. ही पुस्तके २५ टक्के सवलतीत वाचकांना मिळणार आहेत.
या आध्यात्मिक पुस्तकांच्या विक्रीचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बिल्डर्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष राजीव नाईक निंबाळक़र, विजयकुमार लोंढे-पाटील, ‘हॅप्पी थॉटस्’ संस्थेचे सर्व प्रतिनिधी व नागरिक उपस्थित होते.

