बौध्दजन पंचायत समिती मीरा भाईंदर गट क्रं.३३ चे मार्गदर्शन शिबिर संपन्न

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ३१ मार्च २०२३ । मुंबई । बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने भाईंदर गट क्र. ३३ च्या दहा शाखांमधील महिला पुरुष सभासदांचे मार्गदर्शन शिबीर गट प्रतिनिधी तथा अर्थ समिती चिटणीस आयु. विलास तानू जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आयु. चंद्रशेखर मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली तसेच मुख्य अतिथी म्हणून दापोली बौध्द संघाचे माजी सभापती व दि बुध्दिस्ट पर्सनल लॉ मसुदा समितीचे कार्यकारी सदस्य आयु. चरणदास मर्चेंडे साहेब यांच्या उपस्थितीत रविवार दि. २६, मार्च २०२३ रोजी, भाईंदर (पूर्व) येथे संपन्न झाले.

सदर प्रसंगी शाखा क्र. ८२२ चे चिटणीस राजेश पवार व शाखा क्र. ६१८ चे नरेश मर्चंडे यांनी सुत्रसंचलनाची धुरा पेलवली. तर गट प्रतिनिधी विलास जाधव यांनी प्रास्ताविक सादर केले त्यात त्यांनी बौध्दजन पंचायत समितीच्या स्थापने पासून ते आज पर्यंतची माहिती सांगितली, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न होते की, मध्ये मुंबईत आपल्या बौध्द समाजाचे एक सभागृह असावे पण बाबासाहेबांच्या अकस्मात महापरिनिर्वाणा मुळे ते झाले नाही पण सुर्यपुत्र भैय्या साहेब तथा यशवंतराव आंबेडकर यांनी बाबासाहेबांच्या नावाने जगातील पहिले सभागृह भोईवाडा परेल येथे बांधले त्या नंतर बाबासाहेबांचे नातु भैय्यासाहेब आंबेडकर यांचे चिरंजीव बौध्दजन पंचायत समिती चे सभापती आणि पिंपल्स एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या चाणाक्ष बुद्धीने सात माळ्याचे भव्य दिव्य असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह आपल्या सर्वांच्या मेहनतीच्या जोरावर ऊभे राहात आहे. पाच माळे पूर्ण झाले असून बाकी काम प्रगतीपथावर आहे.
सभापती आनंदराज आंबेडकर साहेबांनी केलेल्या कामाची माहिती सांगितली त्यामध्ये प्रामुख्याने महिलांसाठी केलेल्या उपाययोजना, वैद्यकीय मदत, शैक्षणिक मदत याची माहिती दिली तसेच बौध्दजन पंचायत समितीच्या पतपेढी ची माहिती देऊन, पतपेढीतून मिळणारे फायदे यांची माहिती सांगितली. तसेच शाखा क्र.७५५ प्रगती महिला मंडळाच्या चिटणीस दिपाली दिपक कदम यांनी सुंदर विचार मांडले.

सदर प्रसंगी मुख्य अतिथी चरणदास मर्चेंडे साहेब यांनी सुंदर प्रबोधन केले तसेच त्यांनी प्रत्येक कार्यकर्त्यांचे काम काय आहे याची जाणीव करून दिली. तसेच बौद्ध कायदा का असावा याची तपशीलवार मार्गदर्शन केले. खास करून बौध्द महिलांसाठी बौद्ध कायदा किती महत्त्वाचा आहे याची माहिती दिली.

सदर कार्यक्रमास सर्व शाखांच्या महिला व पुरुष कार्यकर्त्यांनी उस्फुर्त असा प्रतिसाद दिला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाखा क्र. ६९७ चे अध्यक्ष तेजस जाधव आणि त्यांची कार्यकारिणी, शाखा क्र.८२२ चे चिटणीस राजेश पवार आणि त्यांची कार्यकारिणी शाखा ७२३ चे उपाध्यक्ष सुभाष तांबे त्यांची कार्यकारिणी, मिटिंग साठी नेहमीच जागा उपलब्ध करून देणारे शाखा क्र. ६१८ चे अध्यक्ष महेन्द्र जामगेकर आणि त्यांची कार्यकारिणी शाखा क्र. ७६१ चे अध्यक्ष आयु. लाडोबा सकपाळ त्यांची कार्यकरनी मोलाचे सहकार्य केले. तसेच शाखा क्र. ६०८, ७१७,७३०,७३३,७५५ यांच्या कार्यकर्त्यांनी मोलाचं सहकार्य केले त्याबद्दल गट प्रतिनिधी विलास जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानून संरणथ् घेऊन कार्यक्रमांची सांगता केली.


Back to top button
Don`t copy text!