प्रोग्रेसीव्हमध्ये विद्यार्थी व पालकांसाठी २० जुलैला विशेष मार्गदर्शन कार्यशाळा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १९ जुलै २०२४ | फलटण |
सरस्वती शिक्षण संस्था संचलित प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, कोळकी येथे ‘आकाश डिजिटल, पुणे’ च्या वतीने विद्यार्थी व पालकांना NEET, IIT – JEE आणि CET परीक्षांच्या फाउंडेशन कोर्सच्या संदर्भात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले आहे.

या कार्यशाळेत NEET, IIT-JEE तसेच CET परीक्षांच्या पूर्वतयारीविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या कार्यशाळेसाठी ‘आकाश डिजिटल’ चे संचालक श्री. कुलदीप भारद्वाज सर ( B.Tech. – VIT Vellore) श्री. दीपक प्रसाद सर विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करणार आहेत. ‘आकाश डिजिटल’ हे गेली ३५ वर्षे शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेले नामांकित कोचिंग इन्स्टिट्यूट आहे. आकाशच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांनी IIT-JEE, NEET आणि CET परीक्षांमध्ये उज्ज्वल यश संपादन करून नामांकित इन्स्टिट्यूटमध्ये गुणवत्तेच्या जोरावर प्रवेश घेतलेले आहेत. अशा कार्यशाळेचा लाभ फलटण शहरातील इयत्ता आठवी ते इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी घ्यावा. संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालिका सौ. संध्या गायकवाड मॅडम यांनी केले आहे. ही कार्यशाळा शनिवार दिनांक २०/०७ /२०२४ रोजी होणार आहे.

विद्यार्थी मार्गदर्शन सत्र – स. ११:०० ते १२:३० वा.
पालक मार्गदर्शन सत्र – दु. १:०० ते २:०० वा.
स्थळ : प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, कोळकी, ता. फलटण
संपर्क क्रमांक – ९२२६४०२१९०


Back to top button
Don`t copy text!