
दैनिक स्थैर्य | दि. 22 जुलै 2025 । फलटण । जैन सोशल ग्रुप फलटण आणि जैन सोशल ग्रुप इंटरनॅशनल फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, २२ जुलै २०२५ रोजी सकाळी १० वाजता हॉटेल विसावा हॉल, फलटण येथे एक विशेष सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. उद्योग भूषण पुरस्काराने सम्मानित महाराष्ट्र राज्य व्यापारी महासंघाचे अध्यक्ष व जैन सोशल ग्रुप फलटणचे संस्थापक अध्यक्ष मंगेशशेठ दोशी यांचा सन्मान करण्यात येणार आहे. याशिवाय, जे एस जी फेडरेशन फाउंडेशनचे विद्यादुत दातार, पालवी संस्थेस आर्थिक मदत करणाऱ्या दातारांचा तसेच विशेष प्राधान्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा देखील सत्कार होणार आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष जैन सोशल ग्रुप इंटरनॅशनल फेडरेशनचे प्रेसिडेंट बिरेनभई शहा असतील. प्रमुख पाहुणे म्हणून उपाध्यक्ष मनेश शहा, महाराष्ट्र रिजनचे व्हाईस चेअरमन सचिन दोशी आणि जेष्ठ पत्रकार अरविंद मेहता उपस्थित राहणार आहेत.
जैन सोशल ग्रुपने या विशेष कार्यक्रमात त्यांच्या सन्माननीय सदस्य व पदाधिकाऱ्यांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. संघटनेच्या वतीने सत्काराचा हा कार्यक्रम समाजातील विविध क्षेत्रांत विशेष कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी आयोजित करण्यात आला आहे.
या सत्कार समारंभामुळे स्थानिक व्यापारी समाज, सामाजिक कार्यकर्ते व विद्यार्थी वर्ग यांना एकत्र आणून सामाजिक बांधिलकी आणि उद्योजकतेचा आदर्श प्रसारित होईल, असा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.