
स्थैर्य, फलटण, दि. १४ ऑगस्ट : बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया, फलटण सेंटरच्या वतीने ‘डॉक्टर्स डे’, ‘सीए डे’ आणि ‘शेतकरी दिवस’ यांचे औचित्य साधून विशेष सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला.
यावेळी डॉक्टर्स डे निमित्ताने डॉ. रणजित बर्गे, सीए दिनानिमित्ताने सीए निखिल भोईटे आणि शेतकरी दिनानिमित्ताने प्रगतशील बागायतदार भानुदास तावरे यांचा सत्कार करण्यात आला. असोसिएशनचे अध्यक्ष महेश साळुंखे आणि खजिनदार निखिल सोडमिसे यांच्या हस्ते हा सन्मान सोहळा संपन्न झाला.
समाजाच्या विकासात विविध क्षेत्रांचे योगदान मोलाचे असते, त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे असोसिएशनच्या वतीने सांगण्यात आले.