सातारा डाक विभागातर्फे महिला सम्मान बचत पत्र खाते उघडण्यासाठी विशेष मोहिम

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०८ जुलै २०२३ । सातारा । सातारा डाक विभाग विविध मोहिमा आयोजित करुन केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजना सर्व जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी विशेष प्रयत्नशील आहे. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून आम्ही सातारा डाक विभागामार्फत महिला तसेच मुली साठी महिला सम्मान बचत पत्र  उघडण्यासाठी विशेष मोहिमेचे दि. 10 जुलै 2023 ते दि. 12 जुलै 2023 या कालावधीमध्ये आयोजन केले आहे.

हि योजना महिला व मुलींकरिता  उपलब्ध असून बचत पत्राची मुदत 2 वर्षे राहील एका महिलेच्या नावावर किंवा अज्ञात मुलींच्यावतीने तिच्या नावावर तिचे पालक बचत पत्र घेऊ शकतात. बचत पत्रामध्ये किमान 1 हजार रुपयापासून कमाल मर्यादा 2 लाख (100 च्या पटीत ) एवढी गुंतवणूक करता येईल. दि. 1 एप्रिल 2023 ते 30 जुन 2023 या तिमाहीमध्ये सध्याचे व्याजदर 7.5टक्के प्रति वर्षे एवढे असून व्याज हे चक्रवाढ पध्दतीचे असेल.

3 महिन्याच्या फरकाने एका व्यक्तीच्या नावाने कितीही खाते उघडता येतील ( कमाल मर्यादा रु.२ लाख )असेल. एक वर्षे झाल्यानंतर खात्यातील 40 टक्के रक्कम एकदाच काढता येईल. अपवादात्मक परिस्थिती शिवाय खाते मुदतपूर्व बंद  करता येणार नाही .

ही योजना राबण्याकरिता जिल्हयातील सर्व ग्रामपंचायत, नगर परिषद, प्राथमिक व माध्यमिक शाळा,गैर सरकारी संस्था, खाजगी  संस्था पुढाकार घेऊन आपल्या भागातील सर्व महिला तसेच मुलींचे खाते उघडू शकतात. सातारा  जिल्ह्यातील सर्व नाबरिकांना या मोहिमेमध्ये सहभागी होण्याची  विनंती डाक विभागातर्फे करण्यात येत आहे.

अधिक माहिती साठी व खाते  उघडण्यासाठी  आपल्या जवळच्या  डाक कार्यालयात मध्ये किंवा सातारा विभागीय कार्यालय, सातारा. फोन नं.02162/237443,237437 Email ID- [email protected].  Website- www.indiapost. gov.in यांचेशी संपर्क साधावा.


Back to top button
Don`t copy text!