दैनिक स्थैर्य । दि. २१ मे २०२२ । फलटण । सासकल ता.फलटण येथे कृषि विभागामार्फत सोयाबीन उगवण क्षमता तपासणी कार्यक्रम श्री.श्रीमंत धोंडीबा घोरपडे गाव सासकल ता फलटण जिल्हा सातारा यांच्या येथे घेण्यात आली. यावेळी कृषि सहाय्यक सासकल सचिन जाधव यांनी बियाणे उगवणक्षमता तपासणी बाबत सविस्तरपणे मार्गदर्शन केले.खरीप हंगाममध्ये उत्पादित सोयाबीन बियाणे जतन करणे या मोहीमे अंतर्गत जतन केलेल्या बियाण्याचे उगवणक्षमता तपासणी कार्यक्रम संपन्न झाला यावेळी सासकल ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.उषाताई फुले व गावातील शेतकरी उपस्थित होते.
घरच्या घरी उगवणक्षमता तपासणी प्रात्यक्षिक घेण्यात आले यात प्रात्यक्षिक घेतलेल्या जागी ७ दिवसांनी ती जागा उघडल्यानंतर १०० टक्के बियाण्यापैकी ८९ टक्के बियाणे उगवण झालेले आढळले. म्हणजे थोडक्यात बियाण्याची उगवणक्षमता ८९ टक्के आहे. तयार झालेले बियाणे गावातील शेतकऱ्यांना कमी दरात उपलब्ध करून देणार असल्याचे यावेळी कृषि सहाय्यक श्री.सचिन जाधव यांनी सांगितले.
यावेळी प्रगतशील शेतकरी श्री.श्रीमंत घोरपडे, तुकाराम साहेबराव मुळीक,जेष्ठ शेतकरी पोपट केशव घोरपडे, पोपट फुले, किसन बबन चांगण,हिरालाल मुळीक, माणिकराव घोरपडे, दत्तात्रय मदने,संजय घोरपडे, नंदकुमार जगन्नाथ घोरपडे, उत्तम विठ्ठल घोरपडे, नितीन धनाजी घोरपडे, महादेव फडतरे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.