
दैनिक स्थैर्य । 17 मे 2025। फलटण । राजळा सर्कल (सोनगाव बंगला) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत 1994 ते 1997 या कालावधीतील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात झाला.
या निमित्ताने तब्बल तीन दशकांनंतर शिक्षक, विद्यार्थी व विद्यार्थिनी एकत्र येऊन जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला. परस्परांमधील आपुलकी, प्रेम आणि शाळेच्या गोड आठवणींनी कार्यक्रमाचे वातावरण भावनिक झाले होते. आमच्या यशामागे शाळेचीच पहिली पायरी आहे, असे गौरवोद्गार विद्यार्थ्यांनी व्यक्त केले. माजी विद्यार्थ्यांनी जुने क्षण पुन्हा अनुभवले. यावेळी शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. त्यावेळी शिकवणारे शिक्षकही या स्नेहमेळाव्यास उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सेवानिवृत्त शिक्षक कृष्णा जाधव होते. माजी विद्यार्थी प्रतिनिधी नवनाथ जगताप यांनी प्रास्ताविक केले. राजेश निकाळजे यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी माजी विद्यार्थ्यांनी ओळख करुन दिली. माजी विद्यार्थ्यांकडून शाळेला घड्याळ व सिलिंग फॅन भेट देण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना आठवण म्हणून गुलाबाचे रोप भेट देण्यात आले.
स्नेहमेळाव्यास कृष्णा जाधव, अशोक रणवरे, शंकर माने, विजय लोकरे, नानासो धायगुडे, प्रतिभा कुंभार, नितीन बनसोडे, संतोष माडकर आदी शिक्षक उपस्थित होते. तसेच दुर्गा ननावरे, स्वाती यादव, वंदना बनेनवार, अनिता मोरे, आदीका पिंगळे, अश्विनी पिंगळे, सविता गायकवाड, भारती भुजबळ, अंजली लोंढे, नवनाथ जगताप, राजेश निकाळजे, रमेश मदने, जयवंत मोरे, कालिदास भोईटे, विकास जाधव, आनंदा चव्हाण, प्रदीप खरात, आनंदा ठोंबरे, विशाल मोरे, किरण मोरे, रामा वीरकर, प्रदीप वायफळकर, नंदकुमार कुदळे हे माजी विद्यार्थी उपस्थिती होती.
यावेळी मुख्याध्यापक धनाजी मोरे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष धर्मराज लांडगे, माजी सरपंच पोपटराव बुरुंगले, हनुमंत गायकवाड, दत्तात्रय भोईटे आदी मान्यवर उपस्थित होते.