गोखळी येथील सोमनाथ धर्माधिकारी यांनी बनवला अजिंकयतार्‍याचा ‘दक्षिण महादरवाजा’

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १६ मे २०२३ | फलटण |
छ. शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ले अजिंक्यतारा किल्ल्यावरील दक्षिणेकडील ‘दक्षिण महादरवाजा’ या ऐतिहासिक महादरवाजा ऊन-पावसामुळे जीर्ण झाला होता. सातारा येथील राजा शिवछत्रपती परिवाराने या दरवाजाच्या ठिकाणी पूर्वी होता तसा नवीन महादरवाजा बनविण्यासाठी फलटण तालुक्याच्या पूर्वभागातील गोखळी येथील सोमनाथ धर्माधिकारी यांना काम दिले होते.

हा ‘महादरवाजा’ बनविण्याचे काम सोमनाथ धर्माधिकारी यांनी कमीतकमी कालावधीमध्ये अत्यंत हुबेहूब सुबक केले. या दरवाजाची उंची १६ फूट, रूंदी ८ फूट, वजन अंदाजे २ टन असून किल्ल्याच्या दक्षिणेला असल्याने ‘दक्षिण महादरवाजा’ असे त्यास म्हणतात. या महादरवाजाच्या दोन्ही बाजूला दोन मोठे बुरूज आहेत आणि दरवाजाला एक छोटी दिंडी दरवाजा आहे. या दरवाजाची उंची एवढी आहे की, या दरवाजातून हत्ती अंबारीसह जाऊ शकतो. महादरवाजा बनविण्यासाठी सागवान लाकूड वापरण्यात आले असून कामाचा कालावधी दीड महिना लागला.

सातारा येथील राजा शिवछत्रपती परिवार यांनी हे महादरवाजाचे काम दिले होते. छ.शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावण झालेल्या ‘किल्ले अजिंक्यतारा’ किल्ल्यावरील दक्षिणेकडील ‘दक्षिण महादरवाजा’ नवीन तयार करण्याचे भाग्य मला माझ्या कुटुंबाला आले, धन्य झालो, असे सोमनाथ धर्माधिकारी यांनी सांगितले.

कमी कालावधीमध्ये हे काम पूर्ण करून नुकताच या ‘दक्षिण महादरवाजा’चा लोकार्पण सोहळा छ. संभाजी महाराज यांच्या जयंतीदिनी होत आहे. गोखळीसारख्या ग्रामीण भागातील कारागिर सोमनाथ धर्माधिकारी यांनी किल्ले अजिंक्यतारा किल्ल्याचा ‘दक्षिण महादरवाजा’ बनविल्याबद्दल त्यांचे गोखळी आणि पंचक्रोशीतून अभिनंदन केले जात आहे.


Back to top button
Don`t copy text!