सामाजिक बांधिलकी जपताना काही पत्रकार आणि पत्रकारांच्या संघटना प्रामाणिकपणे काम करत आहेत; आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे प्रतिपादन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १५ फेब्रुवारी २०२३ | फलटण |
आधुनिक समाजात अग्रणी असलेल्या चारही स्तंभांचा दर्जा ढासळला आहे. त्यास दुर्दैवाने पत्रकारीताही बळी पडत आहे; परंतु आशादायक बाब म्हणजे सामाजिक बांधिलकी जपताना काही पत्रकार आणि पत्रकारांच्या संघटना प्रामाणिकपणे काम करत आहेत. इंडियन रिपोर्टर असोसिएशन इंटरनॅशनल नवी दिल्ली ने हा वारसा कायम ठेवावा, असे सूचक विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले.

फलटण येथील लक्ष्मी विलास पॅलेस येथे आयोजित संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी व सातारा जिल्हा पदाधिकार्‍यांच्या नियुक्ती व सत्कार कार्यक्रमानिमित्त ते बोलत होते. इंडियन रिपोर्टर असोसिएशनबद्दल कौतुक करून डॉ. उज्ज्वला शिंदे यांनी दिल्लीमधून गल्लीपर्यंत ईराचे नाव आणल्याबद्दल कौतुक केले. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना रामराजेंनी इंडियन रिपोर्टर असोसिएशनच्या प्रत्येक कार्याला शुभेच्छा देऊन त्यांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

कार्यक्रमाची सुरूवात मान्यवरांच्या हस्ते मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार व दीपप्रज्ज्वलनाने करण्यात आली. तुर्कस्तान आणि सीरियामध्ये मोठ्या भूकंपामध्ये जे बळी पडले त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय कुमार कोटेचा इंडियन रिपोर्टर असोसिएशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष यांनी केली. यावेळी आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचा सत्कार संजय कुमार कोटेचा यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर यांचा सत्कार डॉक्टर उज्ज्वला शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.

इंडियन रिपोर्टर असोसिएशनच्या महाराष्ट्र राज्य प्रसिद्धीप्रमुख म्हणून ‘साप्ताहिक पडसाद’च्या संपादिका डॉ. उज्ज्वला शिंदे, महाराष्ट्र राज्य सचिवपदी साप्ताहिक भावनगरीचे संपादक संतोष शिंदे यांना ओळखपत्र, प्रमाणपत्र व नियुक्तीपत्र देऊन श्रीमंत रामराजे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच सातारा जिल्हा अध्यक्षपदी राजकुमार डोंबे, फलटण तालुका अध्यक्षपदी संदीप कदम, सेक्रेटरीपदी सदाशिव मोहिते, उपाध्यक्षपदी विलास इंगळे, माण तालुका अध्यक्षपदी दिलीप कीर्तने, उपाध्यक्षपदी महादेव काटकर, सेक्रेटरीपदी संजय जगताप, माण तालुका प्रसिद्धीप्रमुख म्हणून धवल होरा, समन्वयकपदी उमेश काटकर, खटाव तालुका अध्यक्षपदी विक्रांत येवले, आटपाडी तालुका अध्यक्षपदी महादेव महाडिक, खंडाळा तालुका अध्यक्षपदी निलेश वाळिंबे, दौंड तालुका अध्यक्षपदी निलेश जांभळे इत्यादी मान्यवरांच्या निवडी करण्यात आल्या.

यावेळी डॉ. उज्ज्वला शिंदे, मदनबापू कोल्हे, देवानंद वाकडे, उत्तम धायजे, पुजारी यांनी मनोगत व्यक्त केले. ऑल रजिस्टर न्यूज पेपर असोसिएशन महाराष्ट्र सचिव व दैनिक प्रगत हिंदुस्थानचे संपादक दीपक ढवळेही यावेळी उपस्थित होते. त्यांनी आपल्या मनोगतात इंडियन रिपोर्टर असोसिएशनविषयी व पत्रकारांच्या मागण्यांविषयी सविस्तर विषय मांडला. यावेळी कागल येथील ‘द कसबा सांगाव टाइम्स’ चे प्रकाशन श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच द ब्रिलियंट हेल्थ अँड अ‍ॅग्रो संस्था यांच्यामार्फत माझी वसुंधरा अभियानांतर्गत फलटण तालुक्यामध्ये दहा हजार वृक्षारोपण करण्यात आले. यासाठी इंडियन इंडियन रिपोर्टर असोसिएशनच्या वतीने श्रीमंत रामराजे यांच्या हस्ते श्री. तात्यासाहेब शिंदे यांचा ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे आयोजन साप्ताहिक पडसादच्या संपादिका डॉ. उज्ज्वला शिंदे यांनी केले होते. सूत्रसंचालन दिपा निंबाळकर तर आभार संदिप कदम यांनी मानले. कार्यक्रमास फलटणमधील ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता, डॉक्टर, वकील, महिला कार्यकर्त्या आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!