दैनिक स्थैर्य | दि. १९ एप्रिल २०२४ | बारामती |
आजी-माजी सैनिक यांनी देशासाठी दिलेले योगदान महत्त्वाचे असून त्यांचा आदर करून त्यांची प्रतिष्ठा प्रत्येकाने जपली पाहिजे. प्रत्येक भारतीयासाठी त्यांचे कार्य अभिमानास्पद व प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
जय जवान माजी सैनिक संघटना, बारामती यांच्यावतीने सोमवार, दि. १५ एप्रिल रोजी सैनिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी अजित पवार बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, बारामती बँकेचे चेअरमन सचिन सातव, नगरसेविका कमल कोकरे, सभापती अविनाश गोफणे, राष्ट्रवादी सैनिक सेल प्रदेशाध्यक्ष दीपक शिर्के, पुणे शहराध्यक्ष अविनाश ढोले, जय जवान माजी सैनिक संघटना बारामतीचे अध्यक्ष हनुमंत निंबाळकर, सचिव राहुल भोईटे, खजिनदार नामदेव सायार, कार्याध्यक्ष भारत जाधव, सदस्य रवींद्र लडकत, शिवाजी साळुंखे, गणपत फडतरे, रमेश रणमोडे, शिवलिंग माळी, भारत मोरे, विलास कांबळे, अभय थोरात, पोपट निकम, शिवाजी साळुंखे, श्रीमती वैशाली मोरे, शोभा घाडगे व मधुकर बोरवके, कल्याण पाचांगणे आदी मान्यवर उपस्थित होते.
सैनिकांच्या हितासाठी बारामती नगर परिषदेने घरपट्टी माफ केली असताना यापुढेही सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांसाठी कार्य करत राहणार असल्याचे अजित पवार यांनी यावेळी सांगितले.
सेवा निवृत्तीनंतरसुद्धा सामाजिक बांधिलकी जोपासत सैनिकांनी विविध क्षेत्रात कार्य केले व करीत आहेत व शहीद परिवाराचा सन्मान आणि कडक लॉकडाऊनमध्ये पोलिसांबरोबर कार्य केल्याचे अध्यक्ष हनुमंत निंबाळकर यांनी सांगितले.
याप्रसंगी माजी सैनिक सेलचे पदाधिकारी यांना नियुक्ती त्र देण्यात आले. सूत्रसंचालन श्री. सावळे-पाटील यांनी केले व आभार अभय थोरात यांनी मानले.