स्थैर्य,दि ४: इसकी टोपी उसके सर ही हिंदीतील म्हण तर तुम्ही ऐकली असेलच. या म्हणीला साजेशी अशी एक घटना समोर आली आहे. एका चोराने आधी एक कार चोरी केली. मग ही कार एका व्यक्तीला विकली. आणि पुन्हा ती कार त्याने चोरी केली. ही घटना गाझियाबादमध्ये घडली आहे.
टाइम्स नाउने दिलेल्या वृत्तानुसार, सायबर सेलने चोरीची कार ओएलएक्सवर विकून ती पुन्हा चोरी करणाऱ्या चोराला अटक केली. पोलिसांनी सांगितले की, आरोपी कार पुन्हा विकण्याच्या तयारीत होता. वॅगनार कार ताब्यात घेण्यासोबतच चोराच्या काही साथीदारांचीही ओळख पटवण्यात आली आहे.
सीसीटीव्हीने केला भांडाफोड
अमरोहा आदमपूर भागातील गुर्जर गावातील प्रशांत त्यागी तोच आहे ज्याच्यावर हा आरोप आहे. आधी त्याने या कारची ऑनलाइड जाहिरात दिली. नंतर ही कार अमन नावाच्या एका व्यक्तीला १.४ लाख रूपयांना विकली. अमनने ही कार मेकॅनिककडे दिली होती. तेथूनच प्रशात कार पुन्हा चोरी करून घेऊन गेला. याची माहिती सीसीटीव्ही फुटेजमधून मिळाली.
पाच वेळा विकली गेली कार
प्रशांतने पोलिसांनी सांगितले की, ही त्याने पाच वेगवेगळ्या ठिकाणी विकली होती. तो कार विकून एका आठवड्याच्या आतच पुन्हा चोरी करून घेऊन येत होता. त्याच्याकडे काही फेक पॅन कार्ड आणि आधार कार्डही सापडले आहेत.
पोलिसांनी तपास केल्यावर समोर आलं की, कार नोएडा येथील टान्सपोर्टर निर्मलची आहे. प्रशांत निर्मलचा ट्रक चालवत होता. प्रशांतचा भाऊ मनेंद्र खोटी कागदपत्रे तयार करून चोरीची वाहने विकण्याच्या आरोपात दोन वर्षांपासून तुरूंगात बंद आहे. पोलिसांना त्याने सांगितले की, लॉकडाऊनमध्ये नोकरी गेल्यानंतर तो परेशान होता. त्यामुळे त्यानेही भावासारखी ही फसवणूकीची कामे सुरू केली.