माती परीक्षण ही एक काळाची


दैनिक स्थैर्य । दि. ०४ जानेवारी २०२३ । फलटण । गावातील शेतकऱ्यांना मातीचे महत्त्व पटवून दिले, तसेच ‘माती परीक्षण ही एक काळाची’ गरज या विषयावर योग्य मार्गदर्शन केले. मातीप्रमाणेच पाणी परीक्षण हे ही किती महत्त्वाचे आहे याचे ही योग्य मार्गदर्शन त्यांनी शेतकऱ्यांना केले.

कृषी महाविद्यालय येथील माती व पाणी तपासणी तज्ञ डॉ. प्राजक्ता मेटकरी – खरात यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सासवड येथील उपसरपंच धर्मवीर अनपट, ग्रामपंचायत सदस्य विकास झणझणे, सोसायटीचे सचिव मयूर गायकवाड व ग्रामस्थ उपस्थित होते.

कृषी महाविद्यालय फलटणचे प्राचार्य डॉ. सागर निंबाळकर, कार्यक्रम समन्वयक प्रा. नीलिमा धालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्निल लाळगे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिदूत अभिषेक जाधव, अक्षय जगताप, प्रज्वल धुमाळ, दिपराज इंगळे, हर्षवर्धन इंगळे, प्रसाद जाधव, विराज कदम यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.


Back to top button
Don`t copy text!